गोरेवाडा प्राणी संग्रहालयात ताडोबाच्या वाघाचा मृत्यू





चंद्रपुर: मोहम्मद सुलेमान बेग

चंद्रपूर जिल्ह्यच्या चिमूर तालुक्यातील कोलारा बफर झोन मधून 10 जुन 2020 ला KT- 1 नर वाघाला पकडण्यात आला व त्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात येथे 11 जून 2020 ला दुपारी सोडण्यात आला पण आज दिनांक 22 जुन 2020 ला 11 दिवसातच KT-1 नर वाघाचा मृत्यू झाला मागील पांच महिन्यापासून KT-1 नर वाघाने दहशत घातली होती. बामणगाव, सातारा येथील प्रत्येकी एक व कोलारा येथील तीन असे एकूण पांच व्यक्तीचा वाघाने बळी घेतला होता. वारंवार वाघाचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये रोष पाहून वन विभागाने KT-1 नर वाघाला जेरबंद करून त्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आला होता व तिथे त्या नर वाघाचा मृत्यू झाला . या घटने ने वन्यजीव प्रेमी मध्ये नाराजगी दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!