चिमुर बंदर कोल कंपनीच्या विरोधात पर्यावरणवादीचा एल्गार - कॉरीडोर मध्ये इको.प्रो. चे प्रदर्शन



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रालगत उत्तर दिशेकडील कॉरीडोरच्या लगत बफर झोनला लागुन असलेल्या बंदर कोल ब्लाक मधील कॉरीडोर क्षेत्र लिलाव करन्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला आहे. दरम्यान चिमूर उपविभागीय स्तरावरून परिसरातील पाच ग्रामपंचायतीचे ठराव मागविन्यात आले आहे. बंदर येथील कोल ब्लाक देशातील ४१ कोल ब्लाकच्या यादीत आहे. या कोल ब्लाकचा लिलाव होवु नये यासाठी पर्यावरणवादीनी चिमूर - खडसंगी मुख्य मार्गावरील सिएमपिडीआय जवळील बंदर कोल व कॉरीडोर जंगल क्षेत्रात सोमवारला एल्गार पुरकारला आहे.
           बंदर कोल ब्लाक मधील बंदर, शेडेगाव, अमरपुरी, मजरा, गदगाव जंगल परिसर कॉरिडोर म्हणुन ओळखला जातो. याच मार्गाने वाघ व इतर वन्यप्राणी स्थलांतर करतात. जर याच परिसरात बंदर कोल सुरू झाली तर वाघा सह इतर प्रान्यांचा भ्रमंती मार्ग बंद होनार असल्याने मानव वन्यजीव संघर्ष वाढेल,अनेक वाघाचा मृत्यु होईल, वाघाची प्रजनन क्षमता कमी होईल, वाघ संपला तर पर्यावरणाचा ऱ्हास होईल, गाव शेजारी मातीचे ढिगारे तयार होतील, शेतीच्या जमीनीची पोत पैदावारी घसरेल, मिळतील, भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एम्टा खानीमुळे त्या गावात जिपरीस्थीती निर्माण झाली तीच परिस्थीती बंदर कोल परिसरात उद्धभू शकते.अशी भिती पर्यावरणवाद्यांमध्ये निर्माण झाल्यामुळे हा बंदर कोल बंदर परिसरातील कॉरीडोर क्षेत्रात होवु नये यासाठी इको प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडु धोत्रे यांच्या नेतृत्वात बंदर कॉरीडोर क्षेत्रातील जंगल परिसरात पर्यावरणवादीनी एल्गार पुकारला आहे.
           बंदर कोल ब्लाक च्या विरोधात जिल्हयातील इको प्रो संघटने चे संस्थापक अध्यक्ष बंडु धोत्रे सह तालुक्यातील पर्यावरणवादी मंडळचे अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, ताडोबा मित्र चे इमरान कुरेशी, पर्यावरण संवर्धन समितीचे कवडु लोहकरे यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य अजहर शेख, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष प्रशांत कोल्हे,माजी सरपंच बंडू तराळे, बाबा नन्नावरे, व वन्य जिवप्रेमी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!