राजोलीत अर्सेनिक अल्बम ३० औषधीचे वाटप
मूल (अमित राऊत)
राजोली येथील 'प्रभात सांस्कृतिक मंच' यांचेद्रारे गावातील संपूर्ण कुटुंबांना 'आर्सेनिक अल्बम ३०' या होमियोपौथिक रोगप्रतिकारशक्ती वर्धक औषधीचे निशुल्क वाटप करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीचा संकट सर्व जगावर घोंगावत आपल्या देशात आला. नाही म्हणता म्हणता राजोलीलगतच्या विराव्हा आणि तालुक्याचा ठिकाण असलेल्या मुल नगरात काही रुग्ण आढळले. सामाजील ऋणानुबंध लक्षात घेवून गावाचे स्वास्थ सुदृढ राहावे या हेतूने प्रेरित होवून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या या औषधीचे मोफत वितरण करण्यात आले. यासाठी मंचाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!