तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस द्या श्रमिक एल्गार ची मागणी

राजुरा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गावातील तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना तत्काळ तेंदुपत्ता बोनस द्या
श्रमिक एल्गार ची मागणी


राजुरा - प्रतिनिधी
राजुरा वनपरिक्षेत्रात मागील वर्षी शेकडो मजूर तेंदू पत्ता संकलन करण्याचा काम केलेला आहे.मात्र मजुरांना अजूनही तेंदुपत्ता बोनस मिळालेला नाही.

मजूर आर्थिक संकटात सापडले असताना वनविभाग अजूनही त्यांना मागील वर्षीचे तेंदुपत्ता बोनस दिले नाही. कोविड-19 च्या विषाणूमुळे देशात लॉकडाऊन आहे. याचा फटका मजुरांना बसलेला आहे. यामुळे लॉकडाऊन च्या काळात मागील वर्षीचा तेंदुपत्ता बोनस तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना तत्काळ मिळाल्यास त्यांना फार मोठा दिलासा मिळेल.
यासाठी श्री. घनशाम मेश्राम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा यांच्याकडे कार्यक्षेत्रात येत असलेल्या गावातील तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना मागीलवर्षी चे तेंदुपत्ता बोनस तत्काळ देण्यात यावे व तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!