सातबारा नाही, आदिवासी बांधव सातबाराच्या प्रतीक्षेत
पट्टे मिळूनही सातबारा नाही, आदिवासी बांधव सातबाराच्या प्रतीक्षेत
सातबारा तत्काळ द्यावा - श्रमिक एल्गार चे घनशाम मेश्राम यांनी केली उपविभागीय अधिकारी यांचे कडे मागणी
जिवती तालुक्यातील नंदप्पा येथील विस चे वर आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क कायद्याप्रमाणे शेतीचे पत्ते दोन महिन्यां पूर्वी वाटप केले. मात्र त्यांचे फेरफार करून सातबारा दिले नाही यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पेरणीची वेळ असून शेतकरी शेतीसाठी दारोदार फिरत आहे. सावकाराकडे चकराही मारत आहे. यातून सुटका झाली असती मात्र शासनाने सात बारे न दिल्याने त्यांची कोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सातबारा न मिळाल्याने शेतकरी पीक कर्ज व शासनाच्या सर्व योजनेपासून वंचित आहे.
नंदप्पा येथे पट्टा वाटप झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सात बारे देण्यात यावे. अशी मागणी श्रमिक एल्गार संघटनेने उपविभागीय अधिकारी राजुरा यांचे कडे निवेदनातून केली आहे. निवेदन श्रमिक एल्गार चे श्री. घनशाम मेश्राम यांनी दिले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!