माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती सुरु झाल्याशिवाय कामावर हजर होणार नाही
मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शिक्षण मंत्री, राज्य शिक्षण मंत्री यांना शिक्षण अधिकारी मार्फ़त निवेदन देऊन दिला इशारा
नेरी - प्रतिनिधी (शुभम बारसागडे)
नेरी : - सन 2005 पासून महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा मध्ये शिक्षकेत्तर कर्मचार्याच्या भरतीवर बंदी आहे. या कालखंडात अनेक शाळेतील कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यामुळे राज्यातील 45 हजाराच्या वर शिक्षकेत्तर कर्मचारयांची पदे रिक्त आहेत यामध्ये चतूर्थ श्रेणी कर्मचारी ,शिपाई ,सेवक यांची संख्या खुप मोठी आहे त्यामुळे ही पदभरती व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत चालू शैक्षणिक वर्षात माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत असे निवेदन चंद्रपुर माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळ ने माध्यमिक शिक्षणाधिकारी मा संजय डोंर्लिकर यांच्या मार्फ़त राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री राज्य शिक्षणमंत्री याना निवेदन दिले .
देशात कोरोना विषाणू चे थैमान सुरु असून शाळा जुलै महिन्यात सुरु होणार परन्तु माध्यमिक शाळेची दयनीय अवस्था असून चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यात लिपिक शिपाई ग्रंथपाल सेवक यांची संख्या कमी आहे तसेच काही मोठ्या शाळेत 4 ते 5 शिपाई पदे आहेत त्या शाळेत आता एकही शिपाई नाही एवढी कमतरता असताना त्यांची कामे कोन करणार हा प्रश्न निर्माण होतो. त्यात शाळे ची स्वछता मुलांच्या आरोग्यची देखभाल परिसर स्वछता कोन करणार तसेच इतर शालेय कामे कोंन करणार तसेच ग्रंथपाल नसेल तर पुस्तकें कोंन देणार आणि लिपिक नसेल तर शाळेचा कारभार कोंन सांभाळणार? तेव्हा चतुर्थ क्षेणी कर्मचारी महत्वाचा आहे. शासनाने शिक्षकेत्तर कर्मचार्याचे प्रलंबित प्रश्न सोड़वावे.
त्यात 1 शासननियुक्त समितिने शिफारिस केल्यानुसार नुसार शिक्षकेत्तर कर्मचार्याची अनुकंपासह तत्काल भरती करावी त्यात शिपाई,सेवक,ग्रंथपाल, प्रयोगशाला सहाय्यक 2 बक्षी समितिने शिफारिश केल्याप्रमाने 10 20 30वर्षा नतरचा लाभ तत्काल लागू करावे 3 मा शाळे तिल शिक्षकेत्तर कर्मचारयाना24 वर्षाचा लाभ माननीय उच्च न्यायालया च्या निर्णयानुसार तत्काल द्यावे 4 राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचार्याना यापूर्वीच्या पदोन्नति ची मान्यता तत्काल द्यावे 5 रिक्त जागेवर तत्काल पदभरती करावी अश्या अनेक प्रलंबित मागण्या असून राज्य शासनाने तत्काल अंमलबजावणी करुण पूर्ण कराव्यात अशी शिक्षकेत्तर कर्मचार्याच्या प्रलंबित प्रश्ना कड़े लक्ष देत नाही किवा त्यांची सोडवणूक करीत नाही तोपर्यंत राज्यातील माध्यमिक शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या कामावर हजर होणार नाहीत असे निवेदन चंद्रपुर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेने माध्यमिक शिक्षणाधिकारी संजयजी डोरलिकर यांच्या मार्फ़त राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री राज्य शिक्षण मंत्री याना निवेदन दिले यावेळी कार्याअध्यक्ष मोरेश्वरजी वासेकर प्रशांत हजारे जिल्हा सचिव अशोक पिंपलकर जिल्हा कार्याध्यक्ष अंनता चौधरी जिल्हा कोषाध्यक्ष प्रदीप झाड़े चिमुर तालुका अध्यक्ष सुभाष पायपरे भद्रावती अध्यक्ष अविनाश रेसिमवाले जिल्हा उपाध्यक्ष आदि महामडळचे पदाधिकारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!