शेतक-यांवर दुबार पेरनीचे संकट
शेतक-यांवर दुबार पेरनीचे संकट
शेतकरी आर्थिक संकटात
भविष्याची चिंता
जितेंद्र पेंदाम (सिंदेवाही प्रतीनिधी)
पावसानं चांगली सुरूवात करून दिली. पहिल्याच पावसानं शेतकर्यांना दिलासा दिला.
पाऊस येवुन निघुन गेला. पावसानं उसंत दिल्याने अनेक शेतकरी बियाने शेतात पेरनी केली. घरात असलेला धान शेतात गेला.
आधीच पाणी आल्याने शेती ओलसर होती. पाऊस लागुनच पडला तर शेतकर्यांना चिखल पर्हे भरावं लागले असते. त्यावेळी वातावरनही पावसाचं बनलेला होता. त्यामुळे शेतकर्यांनी घाईगडबडीने धानाची पेरनी केली.
धानाची पेरनी केल्यानंतर पाऊस येईल या आशेने शेतकरी आकाशाकडे डोळे लावुन बघत आहेत. आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल या आशेवर शेतकरी आहे. तब्बल आठदिवस लोटुनसुद्धा पाऊस न आल्याने शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरलं असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाइत जानार की काय अशी भिती निर्माण होत आहे.
पावसानं दडी मारल्याने उगवलेली पिके ही करपत असल्याचे शेतकर्याकडुन सांगितल्या जात आहे.
दोनक दिवसात पाऊस जर आला नाही. तर शेतातील बियाने अर्धवट उगवनार . त्याचा परीणाम शेतकर्यांवर पडनार असल्याचे शेतकर्याकडुन सांगितल्या जात आहे.
त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरनीला सामोर जावं लागनार असल्याचे संकट शेतकर्यांपुढे आ वासुन उभा आहे.
आधिच यावर्षी लाकडाउन असतांना हाताला काम नाही. आर्थिक परीस्थिती जेमतेम असतांना पुन्हा हा संकट आलं तर शेतक-यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहत नाही. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!