वाघाच्या हल्ल्यात गाईला वाचविण्यासाठी गुराखी व गाई जागीच ठार
मोहम्मद सुलेमान बेग /राणी भोयर
वाघाच्या हल्लयात गुराखी सह एक गाय ठार झाल्याची घटना तालुक्यातील बफर झोन क्षेत्रातील कम्पार्टमेंट नं. ७६७ मधील करवन येथे घडली.ही घटना गुरूवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली.मृतकाचे नाव रमेश वेलादी, वय ५५ रा. करवन असे आहे. बफर झोन क्षेत्र असलेल्या करवन येथे वाघाचे मोठया प्रमाणात संचार असल्याने येथे गावकर्यांच्या पुढाकाराने गुरेढोर राखण्याचे काम आळीपाळीने चारपाच जणांकडे आहे. आज सकाळी येथील रमेश वेलादीसह इतर चार जण गुरांचा कळप घेवुन जंगलात गेले होते. दुपारी बारा वाजताच्या दरम्यान याच ठिकाणी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने कळपातील एका गायी वर हल्ला चढविला. त्यात गाय जागीच ठार झाली. गायी वर हल्ला झाल्याने वेलादी याने आरडा ओरड करून गायीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना वाघाने रमेशवरच झडप घेवुन त्यांला जागीच ठार मारले. सोबत गेलेल्या इतर गुराख्यानी गावात जावून या घटनेची माहिती लोकांना आणि वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचार्यांनी तात्काळ घटना स्थळा कडे धाव घेतली. घटना स्थळी बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी बोबडे , क्षेत्रसहायक जोशी, वनरक्षक वासेकर, बंडु परचाके तसेच पोलिस कमचारी उपस्थित होते. घटना स्थळाचा त्यांनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी साठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मृतकाच्या कुंटुंबियांना तातडीची सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याचे वनधिकार्यानी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!