मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर, तर्फे मूल तालुक्यात जीवणावश्यक साहित्याचे वाटप*

*मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर, तर्फे मूल तालुक्यात जीवणावश्यक साहित्याचे  वाटप* 

मूल (आकाश गेडाम) : 
      मॅजिक बस इंडिया फाउंडेशन  चंद्रपूर, ही संस्था जिल्यातील मूल,सावली,चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा आणि कोरपना या तालुक्यात खेळाच्या माध्यमातून जीवनकौशल्य विकास कार्यक्रम राबवित आहे . मॅजिक बस संस्था मूल तालुक्यातील ३५ गावात आणि एकूण ४६ शाळांमध्ये स्केल कार्यक्रमांअतर्गत खेळाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षण विभागासोबत मिळून मुलांच्या आणि पालकांच्या जीवनामध्ये बदलाचे काम करीत आहे .
           आजच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये सुद्धा संस्थेने  अत्यंत गरजु व अंत्योदय यादीतील कुटुंबाना जीवनावश्यक  साहित्य वाटप करून गोर-गरीबाच्या जीवनात एक आशेचा किरण म्हणून काम करीत आहे मॅजिक बस अंतर्गत मूल तालुक्यातील ५७ गावांमध्ये ८१९७ अंत्योदय कुटुंबाना तेल,तूर डाळ,मसूर डाळ,आंघोळीचे साबण,कपड्याची साबण,बेसन,चाय पत्ती,हळद या जीवनावश्यक साहित्याचा समावेश असून मूल तालुक्यातील ५८ गावातील ८१९७ कुटुंब लाभार्थ्यांनी मॅजिक बस संस्थेचे आभार आणि धन्यवाद केले आहे.
         मूल तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप हे मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मा. प्रशांत लोखंडे, सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून तालुका अधिकारी निकिता ठेंगणे यांच्या नियंत्रणात सुरू आहे.तर या साहित्य वाटपामध्ये मॅजिक बस संस्थेचे शाळा सहायक अधिकारी  दिनेश कामतवार, संदेश रामटेके,शुभांगी रामगोंनवार, आकाश गेडाम,निखिलेश चौधरी तसेच गावातील समुदाय संघटक  यांनी कठोर परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!