चिमूर तालुक्यात येवून गेलेला भंडाऱ्यातील "तो" निघाला कोरोना पॉझिटिव
भंडारा जिल्ह्यातून ( कोंडा - कोसरा ) मांगलगाव ( ता. चिमूर ) येथे येऊन गेलेला शिक्षक निघाला कोरोना पॉजिटीव्ह
मांगलगाव व परिसरातील जनतेत पसरली चिंता
शिक्षकाच्या आई - वडिलांना चिमूर कोवीड सेंटर येथे करण्यात आले क्वारनटाइन
रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध सुरु; आई - वडिलांच्या स्वैब अहवालाची प्रतीक्षा
तालूका प्रतीनीधी:
केवलसिंग जुनी
चिमूर, ( 23 जून ) : भंडारा जिल्ह्यातून ( कोंडा - कोसरा ) मांगलगाव ( ता. चिमूर ) येथे येऊन गेलेला शिक्षक कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याची बातमी कळताच
मांगलगाव व परिसरातील जनतेत चिंतेचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत कोरोनमुक्त असलेल्या चिमूर तालुक्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांमुळे कोरोनाचा शिरकाव तर होणार नाही ना, अशी स्थिती चिमूर तालुक्यात निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जांभुळघाट ते शंकरपूर मार्गावरून आतमध्ये 1 किमी अंतरावर आणि भिसी पासून 6 किमी अंतरावर असलेल्या मांगलगाव येथे 15 दिवसापूर्वी मूळचा मांगलगाव येथीलच असलेला एक शिक्षक आई - वडिलांच्या भेटीसाठी आला. आठ ते दहा दिवस गावात राहिला. 15 जून ला तो परत भंडारा जिल्ह्यात गेला. तिकडे गेल्यावर त्याची तपासणी केली असता तो शिक्षक कोरोना पॉजिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला भंडारा जिल्हा प्रशासनाकडून सदर माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने त्या शिक्षकाच्या कुटुंबातील व निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वैब नमुने घेण्याची व क्वारनटाइन करण्याची सूचना चिमूर तालुका आरोग्य प्रशासनाला दिली. त्यानंतर कोरोना पॉजिटीव्ह निघालेल्या शिक्षकाच्या घनिष्ट संपर्कात आलेल्या आई - वडिलांना तालुका आरोग्य प्रशासनाने चिमूर येथील कोवीड केअर सेंटर मध्ये क्वारनटाइन केले व त्यांचे स्वैब नमुने तपासणीकरिता पाठविले. त्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. पुन्हा संपर्कातील काही व्यक्तींचा शोध सुरु आहे. त्यांनाही क्वारनटाइन करून सॅम्पल घेण्यात येतील, अशी माहिती तालुका आरोग्य (T.H.O.) अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम यांनी पब्लिक पंचनामा ला दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!