पेरणी झाली पावसाची प्रतिक्षा

पेरणी झाली आता पावसाची प्रतिक्षा


जितेंद्र पेंदाम ( सिंदेवाही प्रतीनिधी ):-
ग्रामिण भागातील शेतक-यांचे शेतीचे मशागतीचे कामे जोरात सुरू असून पेरणी चे कामे जवळपास संपण्याच्या मार्गावर आहेत.
मागील वर्षीचा झालेला हिसाब जमा खर्च करून , मागील वर्षाचे सुखदु;ख बाजुला सारून बळीराजा पुन्हा एकदा शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.
सतत कर्जाच्या ओझ्याखाली वावरनारा बळीराजा पुन्हा नव्या जोमाने भविष्याच्या वेधात शेती कडे बघत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बियानाची ,पैशाची जुळवाजुळव करून शेती मायमावली कडे आशेच्या किरनानी पाहत आहे मृग नक्षत्र संपला आर्द्रा नक्षत्र सुरू झाला . या नक्षत्रात बहुतेक धानाची व इतरही वाणाची पेरणी करावी लागते.
बियाने ,व मशागतीचे कामे साधली तर शेतकर्यांचे सर्वच साधले. यावरच बळीराजाची मिजास असते.
इथुनच सुरूवात होते भविष्याच्या संकल्पाची .
पावसानं योग्य वेळी यावं ,योग्य उत्पन्न व्हावं आणि धन धान्यांनी समृदध व्हावं यासाठी मायमाऊली शेती कडे बळीराजा प्रार्थना करतो.
शेतकरी बियाने पेरून हल्कासा श्वास घेतला असला तरी जोरदार पावसाची प्रतिक्षा लागुन आहे.ग्रामिण भागात कुठे कुठे खंडीत पाऊस पडला. तर कुठे कुठे पेरनी पुरता पाऊस पडला.
पहिला पाऊस येवुन शेतकर्यांना बियाने पेरायला सुरूवात करून दिली. आता बियाने उगवण्याकरीता पावसाची गरज निर्माण झाली आहे.
आता पावसानं आम्हाकडेही बरसावं अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!