विज बिल माफ करने करीता उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन - हरीश केशवानी वरोरा शहर भाजप तर्फे केली मागणी
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - दिनांक.२३/०६/२०२० जगात थैमान घातलेल्या कोरोनाव्हायरस मुळे सर्वजण परिस्थिती शी आपल्या परीने झुंज देत आहे. जगात पसरलेल्या या व्हायरसमुळे मानवी जीवन विस्कळित झाले आहे, तर अनेकांनी या महामारी मुळे आपले जीव गमावले सुद्धा आहे. जनता या महामारी मुळे हतबल तर झालीच आहे, आणि दुसरे म्हणजे त्यांच्यावर या काळातील आर्थिक देयके यांनीसुद्धा जनता आर्थिक विवेचनात पडली आहे. अश्यात ही परिस्थिती सावरण्यासाठी जनता देवरूपी महा व्यक्तीची येण्याची वाट बघत आहे. कोरोना संक्रमणामुळे मार्च, एप्रिल, मे या महिन्यात लाकडाऊन करण्यात आले होते, त्यामुळे सर्व व्यापार कारखाने कार्यालय बंद होती. रोजंदारी करणाऱ्या लोकांचे काम बंद होते. सर्व उत्पन्न बंद झाल्यामुळे सर्वांना फार पैशाची अडचण सोसावी लागत आहे. पैशाच्या अडचणीमुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे, आणि अश्या काळातच महावितरण खात्याने मार्च एप्रिल मे या तीन महिन्याचे एकत्रित बिल दिले आहे, परंतु जनसामान्य कडे ते भरण्या इतपत पैसे शिल्लक नसल्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला ते बिल भरणा करणे शक्य नसल्यामुळे तीन महिन्याचे बिल माफ करण्यात यावे करिता स्थानीय भाजपा पार्टीने ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच जिल्हाधिकारी साहेब यांच्या नावे सुभाष शिंदे उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदन देण्यात आले सोबतचे राठी साहेब मुख्य अभियंता ऊर्जा विभाग वरोरा यांनासुद्धा निवेदन देण्यात आले. सदर कार्यक्रमाला सुरेश महाजन शहर अध्यक्ष, एहतेशाम अली नगराध्यक्ष, बाबाबागडे, भगवान गायकवाड माजी नगराध्यक्ष, ओम मांडवकर, राजेश साकुरे, प्रकाश दुर्ग पुरोहित, प्रकाश काकडे, विनोद लोहकरे, सौ. सुनीता काकडे माजी बांधकाम सभापती,सौं. कीर्ती कातोरे, सौं. शुभांगी निंबाळकर, सौं. ज्योतीकिटे, सौं.स्वाती, गौरकार, हरीश केशवानी पत्रकार, ओम यादव, अमित चवले, कवीश्वर मेश्राम, महेंद्र सुराणा अमित आसे कर, प्रमोद धवस, शरद कातोरे, जगन ढाकणे पंढरीवरभे इत्यादींची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!