अवैधपणे होणाऱ्या मुरुम व रेती गौण खनिज उत्खननाकडे चिमूर तहसीलदाराचे पुर्णतः दुर्लक्ष,शेडेगाव रेती घाटावरुन रात्रभर ट्रॅक्टर व १० चक्याच्या हायवा गाड्यांनी केली जाते रेतीची दुलाई - माजी शिवसेना चंद्रपूर उपजिल्हा प्रमुख धरमसिंग वर्मा यांनी केली रेती उत्खनन स्थळांची पाहणी


राजकीय दबावात काम करणारा तहसीलदार चिमूरला नको


तहसीलदार संजय नागटिळक यांच्या कार्यपद्धतीची सर्व स्तरावरुन चौकशी होणे आवश्यक

चिमूर तालुक्यातील अवैध उत्खननाकडे चंद्रपूर जिल्हाधिकारी केव्हा लक्ष देणार?

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुकातंर्गत दिनदहाळे व रात्रभर,"रेतीचे व मुरुमाचे,चोर तस्करांकडून अवैधपणे उत्खनन करण्यात येत असताना,रेती व मुरुमांचे उत्खनंन करणाऱ्या चोर तस्करांकडे जाणिवपूर्वक पुर्णतः दुर्लक्ष करणाऱ्या,चिमूरच्या तहसीलदारांची कार्यपद्धत अवैधपणे उत्खनन करणाऱ्या मुरुम व रेती तस्करांना समर्थन देणारी आहे काय? असा प्रश्न चिमूर तालुक्यातील जनतेला पडला आहे.
चिमूर तालुकातंर्गत दोन राजकीय नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ता,ठेकेदार हे,"चिमूर तालुक्यातील विविध ठिकाणावरुन रेतीचे व मुरुमांचे अवैधपणे बिनधास्त उत्खनंन करीत असतांना,चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक हे त्यांच्या अवैध रेती व मुरुमांच्या उत्खननाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
करोडो रुपयांच्या अवैध उत्खननाकडे चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी केलेले दुर्लक्ष,"शासनाचा म्हणजेच चिमूर तालुक्यातील जनतेचा,"लाखो रुपयांचा महसूल,बुडविण्यास कारणीभूत ठरतो आहे.यामुळे अशा तहसीलदारांची चिमूर तालुक्यातील जनतेला गरज नसल्याच्या,"जनमानसात आता जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
राजकीय वरदहस्त असलेल्या मालदारांच्या व इतरांच्या गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे राजकीय दबावात काम व कार्य करणे होय.तहसिलदार सारखा अधिकारी राजकीय दबावात येवून काम व कार्ये करीत असेल तर अशा अधिकाऱ्यांची शासनाला का म्हणून गरज असावी?अशा प्रकारचा चर्चेचा सूर सुध्दा जनमानसात आहे.
चिमूर तालुकातंर्गत मौजा शेडेगाव नदीच्या पात्रातून,"अख्या रात्रभर,१० चक्याच्या आयवा गाड्यांनी रेतीची दुलाई,"चिमूर शहरातून, केली असताना,"चिमूर येथील महशुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी गाढ झोपेत होते, व पोलिस विभागाचे फिरते पथक सुध्दा अनभिज्ञ होते.ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल.कामचोर अधिकारी व कर्मचारी किती अकार्यक्षम असतात आणि बेसावध असतात,याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चिमूर तालुक्यातील सर्रास सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन होय.
      शिवसेनेचे माजी चंद्रपूर उपजिल्हा प्रमुख धरमसिंग वर्मा व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे चिमूर तालुका संघटक विलास मोहिनकर यांनी,"आज, सकाळी मौजा शेडेगाव नदीच्या काठावर जावून,"अवैध रेती उत्खनन प्रकरणाची पाहाणी केली असता,"सदर नदीच्या काठावर रेतीचा साठा आढळून आला, व रात्रभर रेतीचे अवैधपणे उत्खनन करण्यात आले असल्याचे वास्तव समोर आले.
        चिमूर तालुकातंर्गत मुरुमाचे व रेतीचे अवैध उत्खनन सर्रास सुरू आहे.या अवैध उत्खननाच्या,"महाभयंकर धक्कादायक प्रकरणाची,चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार,"केव्हा,"दखल,घेणार?हा मुद्दा चंद्रपूर जिल्ह्यासह अख्या महाराष्ट्र राज्यात गाजतो आहे. 
     चिमूर तहसीलचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या कार्यकाळातील सर्व उत्खनन प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसीलदार  यांची कारकीर्द शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यास कारणीभूत असल्याने व रेतीमुरुम तस्करां बाबत चूप्पी साधून,"त्यांना,समर्थन देणारी असल्याने,अशा अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे,"महाराष्ट्र शासनाला काय काम?शासनाचा महसूल बुडविण्यासाठी अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवता काय?हा महाराष्ट्र शासनाला खडा सवाल!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!