1 जुलै पासून ताडोबा बफर झोन सफारी सुरू करण्याचा निर्णय

चंद्रपुर: मोहम्मद सुलेमान बेग

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पानं सोमवारी अखेर 1 जुलै पासून बफर झोन मधील 13 प्रवेश द्वारा द्वारे पर्यटनास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. ताडोबाच्या कोर क्षेत्रात पर्यटन सुरू होणार नाही. होमस्टे, रिसॉर्ट मालक, जिप्सी चालक आणि मार्गदर्शक यांच्या प्रतिनिधींच्या बैठकी नंतर हा निर्णय घेण्यात आला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर मध्ये वाघ आणि वन्यजीवांचे चांगले वास्तव्य आहे आणि देवाडा, अगरझरी, जुनोना (मोहुर्ली रेंज), मामला (चंद्रपूर), पांगडी, झरी, डोणी (कोलसा ), कोलारा, सिरकाडा, मदनापूर आणि अलिझंझा येथे 13 गेट आहेत. कोलारा (रेंज), नवेगाव आणि रामदेगी (निमढेला) खडसंगीच्या दिशेने आहे.



5 जून रोजी पर्यटन सुरू करण्यासाठी नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीने (एन.टी.सी.ए) पुढाकार दिल्यानंतर, पी.सी. सी.एफ. (वन्यजीव) ने , ताडोबाच्या कोर क्षेत्रा मध्ये पर्यटन सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चे वनसंरक्षक (सी एफ) फील्ड डायरेक्टर एन.आर. प्रवीण म्हणाले, “आम्ही या 13 गेटचे रस्ते उघडणार आहोत. प्रवेश ऑफ लाइन असेल म्हणजेच आगाऊ बुकिंग होणार नाही. ताडोबाला काही महिन्यांपासून कुलूप बंद झाल्यामुळे बेरोजगारीचा सामना करावा लागल्या ने कोर क्षेत्रातील गाईड व ड्रायव्हर्सला ही आम्ही संधी उपलब्ध करुन देऊ.
" प्रवेश शुल्क १,००० ठेवण्यात आले आहे तर जिप्सी शुल्क २,२०० रुपये आणि मार्गदर्शक फी 350 रुपये असेल.
प्रत्येक गेट वरून 30- 40 कि.मी पर्यटन मार्ग उपलब्ध आहेत. प्रत्येक गेट मधून किमान 12 वाहने (दोन शिफ्ट मध्ये प्रत्येकी सहा) परवानगी असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!