अखेर वनविभागाने बम्हणी येथील पट्टेदार वाघास केले जेरबंद



पट्टेदार वाघाने दुपारचे ४ वाजेपासून बाम्हणी या गावामध्ये मांडले होते स्थान


जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.२१ जून २०२० नागभीड पासून ४ किमी अंतरावरील बाम्हणी या गावामध्ये दुपारचे ०४:०० वाजेपासून गावामध्ये पट्टेदार वाघाने थैमान घातले असून या वाघाने शेतकरी मनोहर पाल रा.बम्हणी यास जखमी केले.हि वार्ता गावभर व आजूबाजूच्या परिसरात पसरली असल्याने लोकांची वाघास बघण्यासाठी गर्दी झाली.
वनविभागाने या वाघास पकडण्यासाठी गोठ्याच्या आजू बाजूने जार टाकून पकडण्याची पूर्णपणे तयारी केली. चंद्रपूर ईथुन डॉक्टर येईपर्यंत गावकऱ्यांनी शांतता राखावी याकरीता नागभीड पोलीस स्टेशन चे पोलीस पथक दाखल झाले. आणि कुठल्याही प्रकारची जनतेला हानी पोहचू नये याचे प्रयत्न सुरु ठेवले होते.
वाघास पकडण्याचे प्रयत्न ४ वाजेपासून तर रात्रीचे १०:०० वाजेपर्यंत प्रयत्न सुरू होते . शेवटी डॉक्टरांनी ट्रॅक्यूलाईज करून वाघास बेशुद्ध केले व वाघास वनविभागाने पकडुन पिंजऱ्यात जेरबंद करून घेऊन गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!