रोड ची क्षमता नसतांना SMS कम्पनी च्या हायवा ( टिप्पर ) मोठ्या प्रमाणात सुरू

रोड ची क्षमता नसतांना SMS कम्पनी च्या हायवा ( टिप्पर ) मोठ्या प्रमाणात सुरू


जांभुळघाट ते खापरी डांबर रोडला पडले मोठ मोठे खड्डे 

PWD अधिकारी यांचे दुर्लक्ष

जांभुळघाट  -  प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : चिमुर तालूक्यात येत असलेल्या जांभुळघाट ते खापरी रोड चे डांबरीकरन रस्त्याचे SMS कम्पनीच्या हायवा (टिप्पर) ने चिंध्या - चिंध्या उढवल्या असून या SMS कम्पनीच्या ट्रक द्वारे मुरुम उत्खनन सुरु असुन हे हायवा ( टिप्पर ) हे दिवस - रात्रो सुरु आहे . जांभुळघाट ते खापरी या मार्गाने वाहन मोठ्या प्रमाणात चालत असुन,हे नियमबाह्य वाहतुक व उत्खगनन चालू आहे. याकडे महसुल अधिकाऱ्याचे तसेच PWD अधिकारी यांचे हेतुपरस्पर दुर्लक्ष होत आहे.हा डांबरी करन रस्ता वारंटी मध्ये सध्या असून संपुर्ण डाम्बरी करन चे काम हे निकृष्ट दर्जा झाले तर नाही ना ? हे डांबरीकरन, चुरी व पांदन रस्त्याचे रूपांतर झाले आहे.बऱ्याच वर्षा नंतर हा रस्ता डांबरीकरण मागच्या वर्षी करण्यात आला होता.
या रत्याची देखरेख ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.अभियंत्याला विचारले असता,कम्पनीला सुचना देऊन सुध्दा मानत नसल्याचे  सांगीतले जात आहे.कम्पनी वाले मुजोरी करीत तर नाही ना ? जर अशा प्रकारची मुजोरी करीत असेल तर पुर्ण डांबरी करन रस्त्या च्या खर्चाची भरपाई सार्वजनिक बांधकाम विभागाने वसुल करायला पाहीजे अशी नागरीकांकडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!