घोडझरी अभयारण्या शेजारील गावात वॉटर हिटरचे वितरण

*घोडझरी अभयारण्या शेजारील गावात वॉटर हीटरचे वितरण* 
वन्यजीव संरक्षण ट्रस्टचा पुढाकार (डब्ल्यू. सी. टी.)
घोडझरी/यश कायरकर :                          
               जळाऊ लाकडाचा वापर कमी करण्यासाठी आणि पैशाची बचत करण्याचे लक्ष्य.
          महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत घोडाझरी अभयारण्या लगतच्या 3 ग्रामपंचायतीं मध्ये किटाळी(बो)  येथील 93 कुटुंबांना वॉटर हीटर (बंब) वाटप करण्यात आले आहे.  आणि आता ही वॉटर हीटर शेकडो कुटुंबांना वाटली जाणार आहे.
  घोडाझरी अभयारण्याच्या सभोवतालच्या गावात वन्यजीव संरक्षण ट्रस्ट (डब्ल्यू.सी.टी.) यांच्या अभ्यासात इंधनाचा वापर जास्त होऊ नये आणि लोकांवर आर्थिक ओझे वाढणार नाही तसेच वनसंरक्षण देखील होईल. या करीता वॉटर हीटर बद्दल माहिती सांगन्यात आली. या 30 लिटर च्या वॉटर हीटरमध्ये सेनाच्या गोवर्या, झाडाची पाने, पिकाच्या देठांच्या सहाय्याने पाणी गरम करता येते.  आणि पारंपारिक चुलींपेक्षा कमी वेळात व पाणी लवकर गरम केले जाऊ शकते.  सांगली मध्ये बनवलेल्या या वॉटर हीटरची (बंब) मूळ किंमत 6000/- रुपये आहे, परंतु ते कुटुंबांना 1500 / - रुपयांना 75% टक्के सवलतीत देण्यात येत आहे.  आणि या (बंब) मुळे, जळावू लाकडांची बचत होते, आणि  पैशाची बचतही  होत आहे.  त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन होत आहे.
  अशा प्रकारच्या ऊपक्रमाची स्तुती  जनते कळुन होते आहे.आणि प्रतीसाद ही मीळत आहे.  हे ऊपक्रम वन्यजीव संरक्षण ट्रस्टचे (डब्लू सी टी)च्या  तमन्ना अहमद, पूजा देवुलकर, किशोर बनसोड, विक्रांत वानखेडे,आणि क्रुतूजा ढमाले, व मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन मोहिमेच्या सामाजिक मोहिमेचे परिवर्तक निखिल चौधरी यांच्या सहकार्याने हा ऊपक्रम राबविण्यात आला आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!