बिबट्याने गोठयात बांधलेल्या बैलाची केली शिकार

*बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या बैलाची केली शिकार*
       (लोकांत भितीचे वातावरण बंदोबस्त करण्याची मागणी.)
तळोधी (बा) यश कायरकर.
           तळोधी वन परिक्षेत्र अंतर्गत अलेवाही बिटातील वाढोना या गावातील श्री डॉ. रघुनाथ बोरकर यांच्या घरच्या गुरांच्या गोठ्याची कंपाउंड वॉल ची भिंत ओलांडुन गोठ्यात घुसून बांधलेल्या बैलास रात्री 2 वाजता ठार केले. पहाटे घरातील व्यक्ती ने अंगनातील बल्ब सुरु केला असता बिबट्या ने भिंत ओलांडून पळ काढला. 
या घटनेची माहिती तळोधी वन विभागाला मिळाली असता  श्री के. डी. गरमडे क्षेत्र सहाय्यक तळोधी, एस. बी. पेंदाम वनरक्षक(अतिरिक्त कार्य.)आलेवाही, यांनी मोक्का पंचनामा केला.
                 एका आठवडे पुर्वी याच भागात गावालगत श्री मनोहर गायकवाड यांची शेळी  बिबट्यानेच घराशेजारी मारली होती. आणि काही महीने पुर्वी याच गांवांत एका घराच्या अंगणा बाजूलाच एक बीबट दीर्घ आजारामुळे मेलेला  होता. या गावाच्या परिसरात वाढलेले वाघ व बिबट यांचे वास्तव हे चिंतेचे विषय झालेले आहे. तर वन्यजीव प्रेमींच्या मते याचे कारण या गावाशेजारी व जंगलाला लागूनच असलेली डोंगरी  ही प्रान्यांचा आश्रयस्थान होती. मात्र काही दिवसापुर्वी पासुनच या डोंगरीचे  गिट्टी निर्माण करीता उत्खनन चे कार्य  हे *रात्र दिवसा* सुरू आहे. तर याच मुळे ही जनावरे गावाच्या दिशेला भटकत आहेत. मात्र या प्राण्यांचे गावात येऊन शिकार करने हे संभाव्य मोठ्या धोकादायक घटनेचे आमंत्रनच आहे. तरीही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी असे लोकांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!