पल्स पोलिओ लसीकरण.
जिल्हास्तरीय पल्स पोलियो लसीकरण मोहिमेचे चिरोली व मारोडा येथे थाटात उद्घाटन.
मुल (प्रकाश चलाख)
आज रविवार, दि. १९ जानेवारी.
आरोग्य विभाग जि. प. चंद्रपूर अंतर्गत जिल्हास्तरीय पल्स पोलियो लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मुल तालुक्यातील चिरोली व मारोडा येथे सकाळी जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांच्या उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी, नवजात शिशुला पोलियोचे दोन थेंब पाजून त्यांनी कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन केले. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, ''सुदृढ बालके ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांच्या आरोग्याकडे नियमित लक्ष द्या.पल्स पोलिओ लसीकरणापासून कोणताही बालक वंचित राहू नये याची प्रत्येकांनी दक्षता घ्यावी.'' असे त्या म्हणाल्या.
पार पडलेल्या या कार्यक्रमाला, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. गहलोत, मुल पं. स. चे संवर्ग विकास अधिकारी कपिल कलोडे, पं. स. सभापती चंदूजी मारगोनवार, उपसभापती घनश्यामजी जुमनाके, पं. स. सदस्या सौ. वर्षाताई लोनबले, उश्राळाचे सरपंच बंडू नर्मलवार यांसह प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली व मारोडा येथील वै. अधिकारी तथा कर्मचारी आणि माताभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!