अवैधरित्या साग या झाडांची तोड करून वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त करून आठ आरोपींना केली अटक

चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - वनविकास च्या विशेष पथकाने सागवान चोरी करणाऱ्या चोरट्यांना सागवाणासह पकडून कारवाही केली असून चिमूर येथील राखीव वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या साग या झाडांच्या तोडीवर नियंत्रण बसविण्याकरीता रात्रपाळी गस्तीवर असलेले वनविकास चे पथक सोमवारी ३०/१२/२०१९ रोजी भिसी ते जांभूळविहिरा रोडवर रात्रपाळी गस्त करत असतांना त्या दरम्यान रात्री १० वाजता
अवैधरित्या साग या झाडांची तोड करून त्याची वाहतूक करतांना आढळून आली त्यादरम्यान पथकाने ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.३४ एल ७३३८ ट्रॉली मध्ये सागी ईमारत ४२ नग १.६२६ घ.मी. वणउपज जप्त करून आरोपी दिनेश वासुदेव दिघोरे राहणार भिसी व इतर सात आरोपींना अटक केली जप्त केलेली असून. मालाची किंमत जवळपास १ लाख रुपये असून वाहनांची किंमत पाच लाख असे मुद्देमालासह सहा लाख रुपयाची जप्ती करण्यात आली आहे सदर प्रकरणात आरोपीवर भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ५२ (१) (१A) ४१ (१)(२)(ड)(इ) तसेच महाराष्ट्र झाड तोडणे अधिनियम १९६४ कलम ५(२) प्रमाणे वन गुन्हा नोंद करून आरोपी व ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले. व सदरची कार्यवाही विशेष पथकाचे प्रमुख रमेश बलैया वनपरिमंडळ अधिकारी व क्षेत्र सहाय्यक आशिष बायस्कर, वनरक्षक आर.पी . आगोसे, चव्हाण , घुठे इतर वनाधिकाऱ्यांनी अटक केलेल्या आरोपींना चिमूर न्यायालयात हजर केले.पुढील तपास पश्चिम चांदा वनप्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी विवेक मोरे, सहाय्यक व्यवस्थापक सुनील आत्राम तसेच वनपरिक्षेत्राधिकारी ऋतुराज बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!