चिमूर पं.स च्या सभापती पदी लता पिसे तर उप सभापती पदी रोशन ढोक विजयी

चिमूर पं.स च्या सभापती पदी  लता पिसे तर उप सभापती पदी रोशन ढोक विजयी


चिमूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा कांग्रेसचा झेंडा कायम

चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - चिमूर पंचायत समिती च्या सभापती पदाची निवडणूक हि ओबीसी खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने आज दिनांक.०१/०१/२०१९ ला संपन्न झालेल्या निवडणुकीत लताताई पिसे  या सभापती पदावर विराजमान झाल्या तर  

रोशन ढोक यांची उप सभापती पदी विराजमान झाले ते ६ मते घेऊन विजयी झाले. चिमूर पंचायत समिती मध्ये भाजप चे अजहर शेख , पुंडलीक मत्ते , प्रदीप कामडी , असून नर्मदा रामटेके यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजप च्या संख्याबळात ४ वरून ३ मध्ये संख्या घसरली गेली तर कांग्रेस चे शांताराम सेलवटकर , रोशन ढोक , विदया चौधरी , भावना बावनकर , लता पिसे , गीता कारमेगे व नर्मदा रामटेके असून संख्याबळ हि ७ वर गेली असून सर्व सदस्य या निवडणूकिच्या वेळी सभागृहात हजर होते. आज संपन्न झालेल्या या निवडणुकीत कांग्रेस कडून सभापतीपदासाठी लता पिसे तर भाजप कडून प्रदीप कामडी यांनी नामांकन दाखल केले होते यात लता पिसे यांना ६ मते मिळाल्याने  त्या सभापती पदी विजयी झाल्या तर उप सभापती पदी रोशन ढोक यांनी भरारी घेतली असून गीता कारमेगे यांच्यात हि लढत झाली असता  रोशन ढोक यांनी ६ मते घेऊन विजयी झाले . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार संजय नागटिळक यांच्या माध्यमातून हि निवडणूक पार पडली असता संवर्ग विकास अधिकारी पुरी सुद्धा यावेळी उपस्थित होते.चिमूर पंचायत समिती वर कांग्रेस ची या अगोदर सुद्धा सत्ता होती आणि पुन्हा कांग्रेसचीच सत्ता आल्याने काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे .यावेळी कांग्रेस तालुका अध्यक्ष माधव बिरजे ,ओम खैरे , सविता चौधरी , रुषी पिसे अरुण पिसे राका चे राजू मुरकुटे विकास शिंदे व आदींची यावेळी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!