सीएएच्या समर्थनात अहेरी, आलापल्लीकर एकवटले

सीएएच्या समर्थनात अहेरी, आलापल्लीकर एकवटले
 
 
अहेरी (सेवा पवार)
नागरिक संशोधन कायद्याच्या समर्थनात आज राष्ट्रीय एकता मंचच्या नेतृत्वाखाली अहेरी, आलापल्ली येथे स्वयंस्फुर्तीने रॅली काढुन सी.ए. ए ला जाहिर पाठिंबा दिला.  हजारोंच्या संख्येत सहभागी नागरीकांनी वंदे मातरम, भारत माता की जय, सीएए लागू करण्याच्या घोषणा देत रॅली काढण्यात आली. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने रॅली आलपल्ली येथील राम मंदिर पासून सावरकर चौक येथपर्यंत रॅली काढण्यात आली.त्यानंतर या रॅलीचे अहेरी येथील शंकरराव बेजलवार कॉलेज येथे सभेत रुपांतर झाले. यावेळी भाजपा नेते प्रकाश गेडाम यांनी उपस्थितांना नागरिक संशोधन बिल व त्या संदर्भात पसरविण्यात येणाऱ्या भ्रमाबाबत नागरिकांना संबोधित केले. हजारोंच्या संख्येन रॅली काढत केंद्र शासनाच्या सीएए नागरीकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी दूपारी 12 वाजता सीएएच्या समर्थनात अहेरी,आलपल्लीकर यांनी एस.बी.कॉलेज येथून दक्षिण मुखी हनुमान मंदिर,गांधी चौक ,पोलीस स्टेशन मार्गे उपविभागीय कार्यालय मार्गे रॅली काढली. या रॅलीच्या समोर भारतमातेचा तैलचित्र लावलेले होते, 100 फूट लांब तिरंगा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.

यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षताई ठाकरे,संदीप कोरेत,जयप्रकाश शेंडे,सुरेश गडमवार,प्रकाश गेडामरवी नेलकुद्री, अमित बेजलवार,स्वप्नील वरघणते आदींची उपस्थिती होती. या रॅलीत आलापल्ली अहेरी येथील मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग, युवक वर्ग यांनी सहभाग घेतला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!