ब्रम्हपुरी जवळील काहाली गावात अचानक दोन घोणस प्रजातीचे घोणस साप प्रणयमिलन करताना आढळल्याने गावात खळबळ

ब्रम्हपुरी जवळील काहाली गावात अचानक दोन घोणस प्रजातीचे घोणस साप प्रणयमिलन करताना आढळल्याने गावात खळबळ 


ब्रम्हपुरी - प्रतिनिधी ( स्वप्नील अलगदेवे )

ब्रम्हपुरी : - ब्रम्हपुरी जवळील काहाली गावात अचानक दोन घोणस प्रजातीचे साप प्रणयमिलन करताना आढळल्याने गावात खळबळ उडाली असून तात्काळ सर्पमित्राला कळविले व सर्पमित्र ललित उरकुडे, बंटी पारशी,श्रुत कुंभारे,कैवल्य कापगते यांना पाचारण करण्यात आले.सदर साप हे खूप आक्रमक झाल्याने त्यांना पकडण्यात सर्पमित्र यांना अडचण येत होती.
तरीही सर्पमित्रांनी मोठ्या शिताफिने दोन्ही घोणस साप पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले.सापांना सोडते वेळी गार्ड प्रणय कोसुरकर उपस्तीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!