गतिरोधक लावण्याची मागणी.
मुल (प्रकाश चलाख)
मुल ते पोंभुर्णा राज्य महामार्गावरील चिरोली येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय समोर भरधाव वाहनांची वर्दळ वाढली असून तीथे गतीरोधक लावण्याची मागणी महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय तसेच उलगुलान संघटना तालुका मुलच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देवून करण्यात आली.
शाळेत ये जा करण्याकरिता हाच मुख्य मार्ग असल्याने शाळा सुरु व्हायच्या तसेच सुटल्यानंतर येथे विद्याथ्र्यांची मोठया प्रमाणत रेलचेल असते. या विद्यालयासमोर अनेक किरकोळ अपघात झालेले असून भविष्यात होणारे मोठे उपघात होवून जिवीतहानी टाळण्याकरिता विद्यालयासमोर गतीरोधक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एल. लोखंडे, अमोल नामेवार, सुजित खोब्रागडे, आकाश दहिवले, सारिपुत कुंभारे, निरंजन काळे, शैलेश चुनारकर, संतोष कावळे, भास्कर उमरे, मुकेश कुनघाडकर तसेच पालक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!