गणित विषयाच्या भीती न बाळगता सूत्रांची बंदूक हाती ठेवावी माँ दुर्गा कोडपे सरपंच

गणित विषयाच्या भीती न बाळगता सूत्रांची बंदूक हाती ठेवावी माँ दुर्गा कोडपे सरपंच


गणित मेळाव्याचे पिपर्डा  येथे आयोजन

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन क्षेत्रातील लागून अलेलेल्या आदिवासी बहुल गाव पिपर्डा  येथे  दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोज सोमवारला प्रथम एज्युकेशन फॉउंडेशन च्या संकल्पनेतुन ग्रामपंचायत कार्यालय पिपर्डा येथे गणित मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कार्यालय पिपर्डा यांनी संपूर्ण सहकार्य केले.
मेळाव्यासाठी लागणाऱ्या गणिताशी संबंधित प्रतिकृती गावातील सर्व स्तराच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक, माता, आणि पालक यांची मदत घेऊन तयार केलेल्या होत्या. सायंकाळी ०६:०० वा कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम पाहुण्यांचे स्थानापन्न करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण आणि दीप प्रज्वलन करून  मेळाव्याचे उदघाटन मा. भारत भाऊ भेंडारे ( सामाजिक कार्यकर्ता )यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक मा. घनश्याम खोब्रागडे ( विभाग संसाधन प्रमुख )यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी गणित मेळाव्यामुळे मुलांना गणित विषयाची आवड निर्माण होईल, मुलांचे भाषिक कौशल्य विकसित होईल, त्यांची चौकस बुद्धी वाढेल, प्रश्न विचारता येईल, प्रश्नाचे योग्य उत्तर सांगता येईल आणि  विशेष म्हणजे त्यांच्या मनातील गणित विषयाबद्दल असणारी भीती दूर होऊन आवड निर्माण होईल. प्रास्ताविकानंतर मान्यवरांची भाषणे झाली. सर्वांनी  खूप छान मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रदर्शनाचे दालन सर्वांसाठी खुले करण्यात आले. लोकांनी त्याचा छान आस्वाद घेतला. पडणाऱ्या प्रश्नाचे समाधान करून घेतले. मुले खूप छान सांगत होते. उपस्थित सर्व मुलांचे कौतुक करत होते समाधान व्यक्त करीत होते. या संपूर्ण कार्यक्रमास मा. दुर्गा कोडापे(सरपंच )मा. दशरथ सहारे (उपसरपंच )मा. दयानंद पा. बोरकर (शा.व्य.स. अध्यक्ष)मा. विलास पा. बोरकर (शा.व्य.स.उपाध्यक्ष)मा. रुपचंद बारसागडे(तं.मु.अ.)मा विद्या बोरकर, मा. सिडाम सर (ए.ए. वि. विभाग प्रमुख )उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. घनश्याम खोब्रागडे तर आभार मा. योगेश खोब्रागडे (विभाग संसाधन प्रमुख )यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज खोब्रागडे, शुभम चुनारकर, कुणाल रामटेके, प्रशांत गजभिये, स्वाती चुनारकर यांनी जातीने खूप मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!