ॲड.भूपेशकुमार पाटील यांच्या 'गाव पेटून उठतो तेव्हा' या काव्यसंग्रहाचे बँकॉक येथील पहिल्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संंमेलनात लोकार्पण
ॲड.भूपेशकुमार पाटील यांच्या 'गाव पेटून उठतो तेव्हा' या काव्यसंग्रहाचे बँकॉक येथील पहिल्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संंमेलनात लोकार्पण
ग्रामीण भागातील तरुण साहित्यिकाची गगनभरारी
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - प्रसिध्द कवी,विचारवंत ॲड.भूपेशकुमार पाटील यांच्या 'गाव पेटून उठतो तेव्हा' या काव्यसंग्रहाचे लोकार्पण थायलंड देशाची राजधानी बँकॉक येथे ८ नोव्हेंबर २०१९ ला पहिल्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनात सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधिश के.जी.बालकृष्णन् ,संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यसभा सदस्य खासदार अमर साबळे,मलेशिया येथील सुप्रसिद्ध विचारवंत व पत्रकार डी.के.पंजामूर्ती,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,बार्टीचे महासंचालक कैलास कणसे,संमेलनाध्यक्ष प्रा.दीपककुमार खोब्रागडे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन मलेशिया येथील जागतिक किर्तीचे साहित्यिक डॉ.डी.के.पंजामूर्ती यांचे हस्ते झाले.स्वागताध्यक्ष म्हणून राज्यसभा सदस्य खासदार अमर साबळे उपस्थित होते.चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर क्रांंतीभूमीतील गोंदेडा तपोभूमीच्या पायथ्याशी वसलेल्या वडसी या खेडेगावातील मूळचे असलेले भूपेश पाटील यांचा काव्यसंग्रह बँकॉक सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे.
बँकॉक येथील नेल्सन मंडेला साहित्य परिसरात 'सनबीम' हॉटेलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या पहिल्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवी,विचारवंत ॲड.भूपेशकुमार पाटील यांच्या 'गाव पेटून उठतो तेव्हा' या काव्यसंग्रहाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.त्यांच्या या काव्यसंग्रहात ९० कवितांचा समावेश असून नागपूरच्या युरो वर्ल्ड पब्लिकेशनने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.सुप्रसिद्ध साहित्यिक व पहिल्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.दीपककुमार खोब्रागडे यांची दीर्घ प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभली आहे.पहिल्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनात ॲड.पाटील यांच्या काव्यसंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त त्यांचे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाण,बोलीभाषा साहित्य संवर्धन महामंडळ,त्रैमासिक तपोभूमी परिवार,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण विकास संस्था तथा पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!