निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्या.
निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्या.
ऑनलाईन प्रक्रिया सुरु करा, अर्जदार शेतकऱ्यांची मागणी.
मूल (प्रकाश चलाख)
मूल तालुक्यातील शेकडो अर्ज धारक शेतकरी नवीन वीज जोडणी च्या प्रतीक्षेत असून शासनाकडून अजूनही ऑनलाईन प्रक्रिया सुरू न केल्यामुळे नवीन अर्ज धारक लाभार्थी शेतकरी कृषीपंपाच्या विज जोडणीसाठी प्रतीक्षेत असल्याचे विदारक चित्र आहे.
सध्याच्या वीज वितरण पद्धतीनुसार शेतकऱ्यांना 63 व 100 केव्हीए क्षमतेच्या रोहित्रा मधून पंधरा ते वीस कृषी ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्यात येत होता .त्यामुळे वीज हानी मोठ्या प्रमाणात होत होती. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एचव्हीडीएस(HVDS) उच्च दाब वितरण प्रणाली योजना शासनाने अमलात आणली आहे. या योजनेत सौर ऊर्जेचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या प्रणालीमुळे वि ज चोरी होणार नाही. व विजेची बचत होईल. दिनांक 12/ 12/ 2017 ला मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन 5/ 5/ 2018 ला म.शा.निर्णय क्रमांक उविप्र 2018 प्र क्र 30 ऊर्जा 5 दि 5/5/2018 अंतर्गत एचव्हीडीएस उच्च दाब वितरण प्रणाली मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे "अखंडित व शाश्वत वीजपुरवठा "हो य.
लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या शेतात 10, 16, 25 के व्हीं ए रोहित्र उपलब्ध करून दिल्या जाणार असून योग्य दाबाचा वीजपुरवठा देण्यात येणार आहे.
सध्याच्या लघुदाब प्रणाली पेक्षा उच्च दाब विज प्रणालीचे फायदे अधिक आहेत. त्यामुळे शासनाने या योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांना शेतीसाठी शेतात रोहित्र देऊन वीज उपलब्ध करून देण्याचे धोरण अमलात आणले आहे.
या योजनेअंतर्गत निकषात बसणाऱ्या शेतकरी ग्राहकांना विज पुरवठा करून त्यांना लाभ देऊन त्यांची कामे तात्काळ करण्याचे आदेश शासनाद्वारे निर्गमित करण्यात आले आहे.
एचव्हीडीएस प्र नाली पद्धतीत शेतकऱ्याला एकाच ट्रांसफार्मर वरून आपले मोटर पंप चालवण्याची क्षमता/ मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे वीज गळती चे नुकसान 15 ते 50 टक्के पर्यंत टाळल्या जाणा र असून वीज चोरी वर आळा बसणार आहे.
एचडी व्हीएस उच्चदाब प्रणालीअंतर्गत गरजू व अर्जदार शेतकऱ्याला विविध योजने मध्ये वीजपुरवठा देण्याचे नमूद करण्यात आले असून अर्जदार शेतकऱ्याला त्याच्या गरजेनुसार वीज पुरवठा देण्यात येणार असून योग्य विजेच्या दाबाचा पुरवठा मिळणार आहे. यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, रोहि त्र जळणे इत्यादी समस्येतून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.
अधीक्षक अभियंता संचालन व सुव्यवस्था मंडळ महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित, चंद्रपूर .यांचे पत्र क्रमांक अ अ/सवसू /प्रविभाग/ चंद्रपूर /ता. 19- 20 NO. 25370 दिनांक 03 जुलै 2019 पत्राद्वारे प्रलंबित व निकषात बसणाऱ्या सर्व अर्ज धारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत (एचव्हीडीएस )उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत नवीन नियमानुसार वीज जोडणी चा लाभ मिळणार आहे.
गेल्या वर्षभरात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवीन वीज जोडणी साठी अर्ज सादर केलेले आहेत. परंतु शासनाकडून ऑनलाइन प्रक्रिया बंद असल्याने संबंधित विभागाकडून या अर्जांवर पुढील कार्यवाही होत नसून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन नवीन वीज जोडणी साठी विभागात सादर करण्यात आलेल्या अर्ज धारक शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी चा लाभ द्यावा अशी तालुक्यातील अर्जदार शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!