राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन अध्यक्षपदी डाॕ. बाळ पदवाड यांची निवड
राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन अध्यक्षपदी डाॕ. बाळ पदवाड यांची निवड
---------------------------------------
पेंढरी (कोके) येथे २१ व २२डिसेंबरला आयोजन
चंद्रपूर (प्रतिनिधी ) -
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरूदेव सेवा मंडळ , समस्त ग्रामस्थ पेंढरी द्वारा आयोजित १७ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे आयोजन पेंढरी कोकेवाडा ता. सिंदेवाही येथे करण्यात आलेले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॕ. बाळ पदवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. केंद्रीय समितीची नुकतीच चंद्रपूरात महत्वाची सभा संपन्न झाली.याप्रसंगी ग्रामगीता बंडोपंत बोढेकर , सरचिटणीस ॲड.राजेंद्र जेनेकर , विलास चौधरी, विलासराव उगे, संजय वैद्य , संजय पोडे, प्रा. श्रावण बानासुरे आदींची उपस्थिती होती . डाॕ. बाळ पदवाड हे जन्मगाव मोझरी असून त्यांचे शालेय शिक्षण गुरूकुंज आश्रमाच्या शाळेतच झालेले आहे.पुढे नोकरी करतांनाच शिक्षण पुर्ण करून पुढे त्यांनी राष्ट्रसंताच्या साहित्यातील वैचारिक क्रांती दर्शवित्व या विषयावर १९८१ साली आचार्य पदवी मिळविली.तर १९९६ साली त्यांना राष्ट्रपती डाॕ. के.आर.नारायण यांचे हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ५० कैद्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पदवीधर करण्याचे कार्य केंद्र संयोजक म्हणून त्यांनी केलेले आहे . आजवर त्यांची संतवाड-मयावर ७ पुस्तके प्रकाशित असून बीएड अभ्यासक्रमात त्यांची १२ पुस्तके लागलेली आहे. कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या हमारे गाव में हमारा राज या लोकचळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रातील अनेक शाळामहाविद्यालयात त्यांनी राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. कालपात्र नावाचा एक काव्यसंग्रह असून आता ते संत वाड्-मयावर लेखन करीत आहे, हे विशेष.
सदर संमेलन पुढील महिन्यात दि.२१ व २२ डिसेंबर २०१९ ला होणार असून दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात साहित्यदिंडी , उदघाटन समारंभ , पुरस्कार वितरण , परिसंवाद, अनुभव कथन , प्रबोधन संध्या आदी महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी श्रीक्षेत्र गोंदेडा हे पवित्र ठिकाण पेंढरी पासून फक्त ४ किमी अंतरावर आहे हे विशेष.
पेंढरी रे गाव सिंदेवाही-नवरगाव-नेरी- चिमूर मार्गावर आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!