गांधी जयंती निमित्त काजळसर येथे श्रमदान
गांधी जयंती निमित्त काजळसर येथे श्रमदान
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान काजळसरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गावात श्रमदान उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
या श्रमदान उत्सव कार्यक्रमाच्या दरम्यान गावातून फेरी काढून स्वच्छता , प्लास्टिक मुक्त गाव, पोषण आहार, मतदान जनजागृती, ईत्यादी उपक्रम घेण्यात आले . त्याचप्रमाणे ग्रामपरिवर्तक हिराचंद रोहणकर यांचे संकल्पनेतून स्मशानभूमीतील रस्ता दुरुस्ती महाश्रमदानातून करण्यात आले .
दान उत्सव कार्यक्रमाकरिता जि.प. शाळा, आदर्श विद्यालय, स्व.प्रशांतभाऊ कॉलेज , अंगणवाडी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत पदाधिकारी , महिला बचत गट, विविध विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!