चिमूर - ७४ विधानसभा निवडणुकी मध्ये १० उमेदवार रणांगणात

चिमूर - ७४ विधानसभा निवडणुकी मध्ये १० उमेदवार रणांगणात


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - दिनांक. ०७/१०/२०१९ चिमूर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार दि.४ ऑक्टोबर पर्यंत नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर १६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली त्या पैकी दि. ५ ऑक्टोबरला अर्ज छाननी च्या दिवशी दोन नामांकन अपात्र  झाले असून आज दिनांक ७ ला नामांकन परत घेण्याचा दिवशी ४ उमेदवारांनी अर्ज परत घेतले त्या मध्ये चिमूर - ७४ विधानसभा क्षेत्रात १४ उमेदवारा पैकी ४ उमेदवाराची माघार, १ डॉ.रमेशकुमार गजभे अपक्ष, २ गजेंद्र चाचरकर अपक्ष, ३ अमृत नखाते शिवसेना, ४ किशोर घोंनमोडे अपक्ष या उमेदवारांनी आपली उमेदवारी माघे घेतली तर आता चिमूर विधानसभा निवडणुकीत १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत चिमूर विधानसभेसाठी,बंटीभाऊ भांगडीया भाजपा,सतीशभाऊ वारजूकर कांग्रेस,सुभाष पेटकर बहुजन समाज पार्टी, प्रकाश नान्हे भारतीय मजुदूर किसान आघाडी,वनिता जितेंद्र राऊत मानवता पक्ष,अरविंद सांदेकर वंचित बहुजन आघाडी,अपक्ष अजय पिसे,कैलास बोरकर,धनराज मुंगले,हरिदास बोरकर,वरील एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत.
 कोण उमेदवार निवडून येणार या कडे विधानसभेतील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!