मौजा पळसगांव येथे धमचक्र परिवर्तन दिन,विजयादशमी (दसरा)दिन मोठया उत्साहाने साजरा

मौजा पळसगांव येथे धमचक्र परिवर्तन दिन,विजयादशमी (दसरा)दिन मोठया उत्साहाने साजरा


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

अखील भारतीय बौध्द महासभा,आदिवासी समाज,स्वप्न पुष्प दसरा समिती पळसगांव यांच्या वतीने

पळसगाव : -  पळसगाव ( पि )येथील अखिल भारतीय बौद्ध महासभा व महामाया महिला मंडळ च्या  वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने आज ६३ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजन केले होते त्या वेळीं महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ना मा,दामोदर रामटेके,अद्यक्ष,प्रभाकर गजभिये सचिव यांच्या हस्ते मालाअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी . उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही, म्हणूनच आज तुम्ही- आम्ही ताठ मानेने जगत आहोत, 
    बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रचंड गुणसंपदा होती.  
सायकाळी 6 वाजता धम्म धव्यजाचे मा,दामोधार रामटेके अद्यक्ष अखिल भारतीय बुध्द महासभा  यांच्या हस्ते धव्यजरोहन करम्यात आले ,सायंकाळी 7 वाजता स्नेहभोजन चा कार्यक्रम करण्यात आला, सदर कार्यक्रमास उपासक उपसकांनी मोट्या संख्यनी उपस्थिती होती,

आदीवासी समाज बांधवाची एकता

विजयादशमी (दसरा) निमित्ताने  आदिवासी गोंड बांधवांनी  पेरसापेन चौकात  दुपारी 1 वाजता रावणाच्या प्रतिमेची मिरवणूक काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने रावण पूजनचा कार्यक्रम करण्यात आला.
दुपारी पेरसापेन पळसगांव येथील आदिवासी मोहल्यात पटांगणावर भूमक हस्ते रावणाच्या प्रतिमेचे भरतीपूजन व रावण ताटी करण्यात आली. त्यानंतर समस्त आदिवासी बांधवांनी रावण ताटी तसेच नृत्याचे सादरीकरण करून गावातून रॅली काडून संचलन केले. आदिवासी समाजात रावणाला राजा मानले जात असल्याने विजयादशमीच्या (दसरा) दिवशी रावणाचे पूजन करण्याची प्रथा आहे.  रावणाचे माहात्म्य सांगून रावणाचे पूजन का करावे याबाबतची माहिती विशद केली. आदिवासी समाजात रावणाला देव मानतात त्यामुळे रावणदहन थांबवावे, असा संदेश रावणपूजन करून देण्यात आला.  आदिवासी गोंड बांधवांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला सुरेश कुंभरे ,जालिंद कुंभरे, भक्तदास कोहचडे, छत्रपल मसराम,सुनील कुंभरे,विलास कोहचडे,छत्तीस मडावी,दिनकर कुंभरे यांच्यासह आदिवासी  मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

स्वप्नपुष्प मंडळ यांची ट्रॅकटर रॅली कडून विविध झाक्या काडून दर्शनी आराखडा कवायती केली सादर

स्वप्नपुष्प मंडळांनी हनुमान मंदिर पासून ट्रकटर मध्ये विविध झाल्याची रॅली कडून गावातून सावित्रीबाई फुले चौकात आपल्या अंगी असलेल्या कला गुणांची कवायत आखाडे सादर करण्यात आले,या दसरा या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात.अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा असे या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते. याशिवाय कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे देवीला जाण्याचाही प्रघात आहे. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आजच्या काळात आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा द्या असे म्हटले जाते. असल्या प्रकारे सर्वधर्मसमभाव ने गावात विविध जयंत्या सण साजरे कऱण्यात येत असून सर्व समाज मध्ये प्रेमाची व एकोप्याचे भावना दृढ व्हावी असे या कार्यक्रमात सिद्ध होत आहे,सायकली स्नेहभोजण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,सदर दिवशी जवळपास पाच ते दहा गावचे लोक या सणासाठी व कार्यकर्म पाहण्यासाठी मोठी गर्दी असते सदर कार्यक्रमाची व्यापती वाडीत आहे, सदर कार्यक्रमत सुभाष बन्सोड,तुळशीदास शेरकुरे,श्रवण झोडे, सदानंद बन्सोड,रोशन भोले, रोशन बन्सोड,रुपेश चौधरी यांनी हिरिरीने भाग घेतात असल्या कार्यक्रम सादर करून गावात सुख समाधी आनंदी राहतो हाच एकच उद्देश बस एवढेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!