पोटाधिकाराने नाकारला मताधिकार
पोटाधिकाराने नाकारला मताधिकार
स्थलांतरित मजुरा मुळे राजकीय पक्षाला धोका होण्याची शक्यता
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणुक दिनांक.२१ आक्टोम्बर ला होनार आहे मात्र हा महिना शेतातील पिके कापन्याचा महिना म्हणून ओळखला जातो. विदर्भातील सोयाबीन हे हक्काचे पिक आहे मात्र पश्चिम विदर्भात पिक कापणीसाठि मजुरांची वानवा असल्यांर पुर्व विदर्भातील खास करून चिमुर तालुक्यातील बहुसंख्य लोक दिवाळीपूर्वी रक्कम हातात यावी म्हनुन सोयाबीन कापणीकरीता महिनाभर राहण्यासाठी आपापली गावे सोडु दुसऱ्या भागात जातात अशातच आतासुद्धा ग्रामीण भागातील मजूर आपल्या पोटाची खडगी भरण्या करिता अल्पभूधारक ग्रामीण मजूर सोयाबीन कापणीच्या कामा ला गेले असून याचा परीनाम निश्चितच भाजपा व कांग्रेस या पक्षाला बसणार आहे,जास्त मजूर हे ग्रामीण मजूर असून याचा फटका मात्र जास्त प्रमाणात कांग्रेस पक्षला बसण्याची शक्यता आहे, निवडणुकीचा काळ असल्याने मतदारांनी स्थलांतर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही संख्या केवळ मतदारांची असल्याने आणखी मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उदरनिर्वाहाच्या चिंतेने शेतकरी हवालदिल तर दुसरीकडे शेतीच नाही त्यामुळे शेतीवर जगणारे मजूरही रानोमाळ भटकू लागले आहेत.
सगळा शेती व्यवसाय ठप्प झाल्याने गावातील बहुतांश लोकांचे अर्थशास्त्र बिघडले आहे. यामुळे या लोकांवर अवलंबून असलेले गावातील अन्य व्यवसाय आणि व्यावसायिकदेखील अडचणीत आले आहेत. या सार्यातून पोट भरण्यासाठी रोजगाराच्या शोधात आणि भागांतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले आहे. तालुक्यातून हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याच्या भीतीने उमेदवारांनाही ग्रासले आहे.ग्रामीण भागातून गावांतून हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले आहे. यातील अनेकांनी अन्य गावांत जाऊन रोजगार शोधला आहे.
‘तालुक्यातून मोठया प्रमाणात स्थलांतर झाले आहे. काही मजूर परत गावकरी परततील तेव्हा मते देऊन जाण्याचा सल्ला त्यांच्या नातलगांकडे दिला आहे. त्यांनी मताधिकार बजावावा यासाठी जनजागृती करण्यात यावी तरच मतदानाची टक्केवारी वाढेल अन्यथा याचा फटका पक्षला बसणार हे निश्र्चित आहे. पक्ष निवडणूक वेळेत केवळ आश्वासने देवुन तोंडाच्या वाफेवर चालढकल करतात मात्र तोंडाच्या वाफेवर पोट चालत नाहि त्यामुळे पोटाच्या अधिकाराने मताच्या अधिकारावर मात केल्याचे दिसुन येत असुन पोटापाण्याच्या संघर्षात अनेक मतदार मताधिकार वापरण्यापासून वंचित राहतील असे दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!