विकास कामांवर पुन्हा एकदा भाजपा शिवसेना युतीचे सरकार येणार मा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

विकास कामांवर पुन्हा एकदा भाजपा शिवसेना युतीचे सरकार येणार मा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
 

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : -  चिमूर तालुक्यात भिसी येथील मा,महाराष्ट राज्याचे मुख्यमंत्री मा,देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा आज दिनांक.१९/१०/२०१९ ला भिसी येथील हजारो मतदाराच्या उपस्थिती मध्ये आज सम्पन्न झाली,जे ६० वर्षांत कामे झाली नाहीत ती कामे भाजपने ५ वर्षांत पूर्ण केलीत.  जलसंवर्धनाची कामे केलीत. शेती क्षेत्रात मूलगामी परिवर्तन केले पाहिजे. शेतकèयांना इंधन पुरवू शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांचे जीवन समृध्द कसे होईल, यासाठी भाजप कटीबध्द आहे,  असे प्रतिपादन चिमूर  विधानसभा क्षेत्राचे भाजप-सेना-रिपाई युतीचे उमेदवार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले.
चिमूर विधानसभा क्षेत्रातील भिसी येथील  आयोजित प्रचारसभेत ते नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. आपल्या आशीर्वादाने गत  निवडणुकीत निवडून आलो. या पाच वर्षांत सेवा करीत विकासकामे केली. क्षेत्रातील कृषी, पर्यटन, रोजगार वाढीसाठी शासनाच्या विविध योजनांअतंर्गत मोठा निधी खेचून आणला. पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने विकास प्रक्रियेला गती आली आहे. 
आपल्या विभागासह अन्य विभागाच्या योजनांतून जिल्ह्यासह क्षेत्राचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत जनता यंदाही भाजप सरकारसोबत असल्याचे सकारात्मक चित्र आजच्या मतदाराच्या उपस्थित वरून दिसून येते,चिमूर विधानसभा क्षेत्रात आहे. यंदा पक्षाने पुन्हा संधी दिली, विश्‍वास टाकला, पक्षाचा व जनतेच्या विश्‍वासाला यापुढेही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देत भाजप सरकारला पुन्हा निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन बंटीभाऊ यांनी केले.
राज्यातील मोजक्याच आमदारातील एक असे जे बंटी भांगडीया असून तो स्वतः कधी स्वतःचे काम घेऊन आला नाही परंतु चिमूर विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी निधीसाठी ,विकास योजना साठी  शंभरदा आला आणि सर्वाधिक निधी आणून चिमूर क्षेत्रातील ग्रामीण रस्ते विकासाचे जाळे निर्माण केले असून अश्या दिवसरात्र काम करणाऱ्या बंटी भांगडीया यांना पुन्हा एकदा आमदार बनवा पुन्हा नवीन विकास दिसेल असे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आव्हान केले.

 या सभेला माजी आमदार मितेशजी भांगडीया, उमेदवार बंटी भांगडीया, वसंत वारजूकर, डॉ श्यामजी हटवादे, जी प सदस्य संजय गजपुरे  ,शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख धर्मसिह वर्मा ,जितेंद्र मोटघरे ,दिगंबराव गुरपुडे, माजी सभापती राजू झाडे, डॉ दीपक यावले ,बंडू नाकाडे, प्रकाश वाकडे, प्रा विजय टिपले ,अशोक कामडी, डॉ देवनाथ गन्धरे ,बंडू जावळेकर,  पंचायत समिती  सदस्य पुंडलिक मते, प स सदस्य अजहर शेख,  मनोहर मुंगले, जी प सदस्य मनोज मामिडवार, नागभीड भाजप तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, नगराध्यक्ष प्रा उमाजी हिरे, न प उपाध्यक्ष गणेश तरवेकर, उपसरपंच लीलाधर बनसोड, आदी उपस्थित होते .

 यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारसंघातील १५ हजारांच्या महिला,पुरुष मतदार बंधूंना पाच वर्षांतील सरकारच्या काळात घेन्यात आलेले निर्णय हे सर्व समन्यापासून तर महिलाभगिनींना ,शेतकरी ,मजूर ,कामगाना न्याय देणारं सरकार आहे जे ६०-६५वार्षत झाले नाही ते पाच वर्षच्या काळात चिमूर विधानसभा क्षेत्रातील नगरपालिकाची निर्मिती,अतिरिक्त तहसील निर्मिती अनेक मागण्या पूर्ण केल्या त्या तुमच्या युवा कर्तृत्ववान आमदारांच्या प्रयत्नामुळे झाले आणखी पुन्हा नवीन विकास घडविण्यासाठी बंटी भांगडीया यांना निवडुन देण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत आघाडी सरकारने १५वर्षांत काय केले याचा आधी हिशोब द्यावा आम्ही पाच वर्षात काय केले ते सांगतो पाच वर्षात शेतकऱ्यांना धानाला ५००रुपये बोनस दरवर्षी, मावातुळतुळ निधी,बोडळीचा निधी, दुष्काळ निधी,पिकं कर्ज माफी ,जलयुक्त शिवार माध्यमातून शेतकरी सुखी करण्यासाठी झालेली कामे असें अनेक निर्णय घेतले असून अतिक्रमण धारकांना पट्टे देऊन घरकुल देण्यात येणार असून आतापर्यंत साडेतीन लाख कुटुंबातील नागरिकांना पट्टे देण्यात आले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
००यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री आधीच्या सरकारच्या काळात ५लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन पुरवठा देणे बाकी होते पण आम्ही ते पूर्ण कनेक्शन देऊन साडेतीन लाख नवीन शेतकरी याना वीज पुरवठा दिला आहे पाच वर्षात वीज बिल भरले नाही म्हणून कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापली नाही हेच आमचे यश ,चिमूर विधानसभा क्षेत्रात जास्त प्रमाणात वीज केंद्र मंजूर करून आणणारा आणि राज्यतील सर्वाधिक १० आमदरातील हा एक आमदार म्हणजे बंटी भांगडीया असून त्यानं निवडणून आणून आपण पुन्हा आशा क्रियाशील आमदाराला विजयी करा असे बावनकुळे म्हणाले कि यावेळी आमदार बंटी भांगडीया यांनी मतदारांना आव्हान करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार ,मोदी सरकार या केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारने चिमूर विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्या पूर्णत्वास आल्या आहे आणि ते करण्यासाठी सदैव मला तुमची शक्ती ,आशिर्वाद प्रेरणा देते हीच माझी ताकत आहे त्यामुळे मी अनेक प्रश्न पूर्ण करू शकले.

    प्रदीप कामडी नितीन गभने किशोर नेरलावार किशोर मुंगले गोपीनाथ ठोबरे राजू बानकर गोपाळ बलदुवा सचिन गाडीवार सुनील खवसे स्वप्नील गाडीवार किशोर अष्टांकार देवा मुंगले विनोद खेडकर संदीप कामडी लीलाधर बनसोड दीपाली बानकर मंजुषा ठोबरे भारती हुलके आदी भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!