तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी डॉ.सतीश वारजूकर बनले प्रकाश ज्योत

तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी डॉ.सतीश वारजूकर बनले प्रकाश ज्योत


डॉ. सतीश वारजूकर यांचा पुढाकारातून वाचनालयाची  व्यवस्था 


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - चिमूर आग प्रत्येकाच्या मनात असते. त्या आगीला चुकीच्या दिशेने हवा दिली गेली तर एक ठिणगी गाव पेटवून टाकते अन हवा देणारा जर समंजस असेल तर आगीची मशाल होते.क्रांती घडते.शिकून प्रशासकीय सेवेत समावुन देशाची सेवा करू पाहणाऱ्या चिमूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास केंद्रावर प्रशासनाणे निवडणूकांचे कारण देत शासकीय सभागृहातील अभ्यास केंद्र बंद केलं. या अभ्यासिकेत अभ्यास करून देशसेवेची स्वप्नं पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न अंधाराल.पण त्यांना एका उच्चशिक्षिताने अंधारातून उजेडापर्यंत नेलं डॉ. सतीश वारजूकर हे त्यांचं नाव!
    
       ही कहाणी आहे पारतंत्र्यातही  देशाला स्वातंत्र्याची पहाट दाखविणाऱ्या चिमुरची. या क्रांतीनगरीत  एक सामजिक जबाबदारीची जाणीव असलेला अधिकारी काही वर्षपूर्वी आला.त्याने आपल्या मिळकतीतुन सामजिक बंधिकलकी जोपासत स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण जाणून स्थानिक तहसील कार्यालयात एक अभ्यासिका सुरू केली.स्वतः पुढाकार घेऊन मार्गदर्शन केलं अनेकांना प्रशासकीय सेवेत समवण्यासाठी परिपक्व केलं.वर्षभरापूर्वी त्या अधिकाऱ्याची बदली झाली पण त्यांच्या विचार त्याने केलेली पायाभरणी कायम राहिली.
  पण आगामी काळातील निवडणूकांचा हवाला देऊन प्रशासनाने या अभ्यासिकेला खाली करण्याचा निर्णय घेतला. व सर्व विद्यार्थ्यांत काळजीचा सुर सुरू झाला.


       पण त्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावला तो क्रांतिभूमितील समाजसेवक जि.प.विरोधी गटनेता डॉ. सतीश वारजूकर.  त्यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी विद्यार्थ्यांची भेट दिली व त्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत या वर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही विद्यार्थीही हताशले.पण डॉ. वारजूकर यांनी त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नाना आकार द्यायचा होता. त्यांनी अनुसया माता सभागृहात सर्व सोययुक्त अभ्यासिका एका दिवसात सुरू केली.त्यात सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येणार असून त्यातील पुस्तकाचा साठाही वाढविण्यात येणार आहे. तयांचया या कार्याने सर्व विद्यार्थ्यांनी या आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!