ओबीसी च्या हक्कासाठी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

ओबीसी च्या हक्कासाठी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

 
चिमूर : - ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध  ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारला तहसील कार्यालयावर सामाजीक कार्यकर्ता डॉ अजय पिसे यांच्या नेतृत्वात ‘भव्य ओबीसी आक्रोश मोर्चा’ काढन्यात आला.
     ओबीसी समाजातील लोकांची जातनिहाय जनगणना करण्यास शासन दिरंगाई का करत आहे, चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसीनची लोकसंख्या जास्त असतांना ओबीसी चे आरक्षण कमी का करण्यात आले, आजपर्यंत विधानसभेत लोकप्रतिनिधींनी ओबीसी चा मुद्दा का उठवला नाही. मेडीकल, UPSC, MPSC मध्ये ओबीसी च्या सीट का कमी करण्यात आल्या, फक्त ओबीसीलाच नॉन-क्रिमी लेयर ची अट का. स्पर्धा परीक्षा पास होऊनही ओबीसी च्या विध्यार्थांना नियुक्ती पत्र का देण्यात आले नाही. ओबीसी समाजाचा वापर लाचार बनवून फक्त मते मिळविण्यासाठीच का केला जातो. या आशयाचे प्रश्न शासनाला या आंदोलनातून विचारले जात आहे. मोर्चाची सुरवात चिमूर येथील शहीद स्मारकाला वंदन करून करन्यात आली. मोर्चा अभ्यकंर मैदान, मार्केटलाईन,चावळी मोहल्ला, मासळ रोड मार्गे तहसील कार्यालयावर पोहचला मोर्चाचे सभेत रुपांतर झाले विवीध मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले.
        मोर्चेकरानी निवेदण नायब तहसीलदार कोवे यांना दिले. यावेळी डॉ अजय पिसे, रामदास कामडी, माधव पिसे, सुरेश पीसे, आदीत्य पिसे, रामलाल तुपट, दिलीप भेडांरकर, खुशाल टेंभूकर, रविद्र भेंडारकर, ज्ञानेश्वर सहारे रामचंद्र रंदये, नंदलाल ढेंगरे, गजानन गजबे आदी उपस्थित होते. मोर्चामध्ये तालुक्यातील बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!