डी.बी.पथक, पोलीस स्टेशन सावली ची,उत्तम कामगिरी,एक आरोपी ला अटक तीन लाख रुपयांची दारू साठा जप्त
डी.बी.पथक, पोलीस स्टेशन सावली ची,उत्तम कामगिरी,एक आरोपी ला अटक तीन लाख रुपयांची दारू साठा जप्त
सावली (सुरेश कन्नमवार)
आज दिनांक : - 12/09/2019 रोजी मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक,पुंडलिक मस्के सा.पो.स्टे. सावली यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे.सावली येथील डी.बी.पथकाचे कर्मचारी यांनी मुखबीर खबरेवरून मौजा सावली वॉर्ड नं,१० नामे सुरज अरुण सायमवार याचे राहते घराचे बाजूस असलेल्या सांदवाडीत पंचासमक्ष पाहणी केली असता.तेथे ३० नग खाकी खरड्याचे खोक्यात प्रत्येकी १०० प्रमाणे एकूण ३००० नग देशी दारू च्या बाँटल्स किंमत ३,००,०००/- रु चा माल तसेच १ आरोपी नामे,सुरज अरुण सायमवार रा,सावली मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन,सावली येथे अप क्रं,३६२/२०१९ कलम - ६५ (ई)महाराष्ट्र दारूबंदी कायदा अ अन्वये गुन्हा नोंद असून,सदरची कार्यवाही मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक,पुंडलिक मस्के
सा.पो.स्टे.सावली यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे.सावली येथील डी.बी.पथकाचे कर्मचारी पोहवा, केवलराम उईके,पोशि.सुमित मेश्राम,दिपक डोगरे,प्रफुल आडे,यांनी केली असून पुढील तपास सावली पोलीस स्टेशन चे डी.बि पथकातील कर्मचारी करीत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!