शिलाई मशीनचे वाटप .
दानशूरचा राजा गणेश मंडळ अहेरी तर्फे ७१ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप.
दानशूरचा राजा गणेश मंडळ अहेरी तर्फे महिलांनी स्वावलंबी व्हावे ह्या सामाजिक बांधिलकीतुन नुकताच अहेरी विधानसभा क्षेत्रातील ७१ गरजू महिलांना युवा नेते कुमार अवधेशराव बाबा यांच्या हस्ते हिमालया कंपनीच्या शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले ह्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई, प्रवीणराव बाबा, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, यशवंतराव दोंतुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दानशूर गणेश मंडळ तर्फे दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान एक नवीन सामाजिक उपक्रम राबविले जाते त्यानुसार ह्यावर्षी गरीब गरजू महिलांना ७१ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले, ह्यापूर्वीही गरजू शेतकऱ्यांना बैलजोडी वाटप,रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम मंडळा तर्फे राबविण्यात आले होते.
ह्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रवी नेलकुद्री,विनोद जिल्लेला, नितीन दोंतुलवार,श्रीनिवास भंडारी, देवेंद्र खतवार सह इतर सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल गुडेल्लीवार, संचलन पूर्वा दोंतुलवार तर आभार संतोष बेझंकीवार यांनी केले,ह्या कार्यक्रमाला विविध गावांतून आलेले लाभार्थी तसेच अहेरीकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!