चिमूर शहरातील वडाळा पैकू येथे ये - जा करायच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य - योगेश ठुने ( राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष )
चिमूर शहरातील वडाळा पैकू येथे ये - जा करायच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
- योगेश ठुने ( राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष )
चिमूर नगरपरिषदेचे दुर्लक्ष
चिमूर शहरातील नाकरिकांच्या समस्या सुटणार काय ? असा प्रश्न जनता करीत आहे
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ वडाळा पैकू येथील पावसाच्या पाण्याने ये-जा करणाऱ्या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असून जनता विचारात पडली आहे कि रस्त्यावर खड्डे व खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून त्याठिकाणी राहणाऱ्या जनतेला व शाळाकरी लहान मुली व मुलांना तसेच म्हाताऱ्यांन व नागरिकाना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याबद्दल अनेक वेळा नगर सेवकाला जनतेनी बोलले असून त्यावर काहिही अमल बजावणी करण्यात आलेली नाही व असे वारंवार अनेक वेळा झाले असून याबाबत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष योगेश ठुने यांच्यासमोर हि संपूर्ण आप-बिती ठेवण्यात आल्यावर ताबळतोब जनतेच्या स्वाक्षऱ्या घेऊन नगर परिषद गाठून नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.व याबद्दल चर्चा करण्यात आली असून मुख्याधिकारी यांनी दोन दिवसात केलेल्या मागण्यांचे निवारण करणार असे यावेळी स्पस्ट केले. व या साचलेल्या दूषित पाण्यामुळे ताप , डेंगू , मलेरिया यासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वडाळा पैकू येथील कवडु चौधरी यांच्या घरापासून ते लक्ष्मण वाघधरे ते भिवाजी ढोणे यांच्या घरापर्यत चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरीकांनी रस्त्यावरील खड्ड्यात मुरूम टाकण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठुने यांना केली. व यांच्या नेतृत्वात राम वाघधरे , लक्ष्मण वाघधरे सचिन बारेकर, भरत वाघधरे,प्रकाश भोयर,इत्यादी नागरिकानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश खवले यांना निवेदनातून मागणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!