चिमूर व नागभीड तालुक्यातील सतत पावसाने शेकडो घरांची पडझड

चिमूर,व नागभीड तालुक्यातील सतत पावसाने शेकडो घरांची पडझड 

आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी भेटी देत केले जीवनाश्यक वस्तू चा पुरवठा 
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - सतत मुसळ धार पावसाने तालुक्यातिल शेकडो घरे  पडली असून अनेक कुटूंब दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले .गेले असे असून या घटनेची माहिती मिळताच दखल घेत आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी भूमिपूजन सोहळे थांबवून6 सर्व पूरग्रस्त गावाच्या भेटी घेत सवांद साधित त्या कुटूंबियांना जिवनावश्यक वस्तू चा तात्काळ पुरवठा केला. असून प्रशासकीय यंत्रेनेला सुद्धा चौकशी  तसेच पंचनामे करण्याचे सांगितले.

चिमूर तालुक्यात सतत पावसामुळे पळसगाव, पांजरेपार ,खैरी गावात घरांची पडझड झाली होती तर पूरग्रस्त गावांना सुद्धा भेटी दिल्या असून तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेती जलमय झाल्या असून त्या त्या गावातील शेती पंचनामे तात्काळ करण्याचे सुद्धा प्रशासनाला सांगितले.
आमदार किर्तीकुमार भांगडीया हे पूरग्रस्त गावावर नियंत्रण ठेवून त्या गावाची समस्या जाणून प्रशासकीय यंत्रणेला सांगितले व पूरग्रस्त गावातील त्या कुटूंबियांना किराणा व जीवनाशयक वस्तूचा तात्काळ पुरवठा केला.पळसगाव ला पुराणे वेढले असता जोरदार पाऊस येत असताना सुद्धा भूमिपूजन कार्यक्रम त्या क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना करावे असे सांगत त्यांनी नवरगाव मार्गे पळस गाव ला जाऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधून समस्या जाणून घेतल्या तसेच मोटेगाव येथील बोडी फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने त्या घटनास्थळावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून लवकरच जल शिवार योजनेतून काम करून देण्याचा शब्द आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दिला.
व खैरी, पांजरेपार, बामणी पूरग्रस्त गावाला भेटी दिल्या व यावेळी वसंत वारजूकर , डॉ. शामजी हटवादे  , राजू देवतळे ,  बकाराम मालोदे , भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे , मनिष नाईक , चिंतामण नाकाडे , प्रवीण गणोरकर , प्रशात चिडे, मंगेश भुसारी , शरद हिंगे , मायाबाई नांनावरे , कल्याणी सातपुते ,सुनील किटे ,  नरेंद्र हजारे ,  प्रशांत नरोले  , आशीस झिरे ,  सैफ शेफ , बंटी कोरेकर,भूषण सातपुते , आशीस मिसार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!