आरोमशीन चा लोकार्पण सोहळा.

आरो मशीन चा लोकार्पण सोहळा संपन्न.

 मूल( प्रकाश चलाख)

  मुल तालुक्यातील मोजा  तांडाळा, हळदी ,सीतळा येथील आरो मशीन( जल शुद्धिकरण संयंत्र )चा लोकार्पण सोहळा भाजपा नेते प्रमोद कडू यांच्या हस्ते संपन्न झाला.

  लोकनेते, विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 109 मशीन जल शुद्धिकरण संयंत्र बल्लारपूर विधानसभा सभा क्षेत्रातील मूल तालुक्यातील ताडा ला,हळदी सि तळा येथे लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 3 रोजी भाजपा नेते प्रमोद कडू यांच्या हस्ते संपन्न झाला.

 ग्रामीण भागात प्रत्येक नागरिकाला आरोग्य चांगले राहावे याकरिता शुद्ध पाणी आरो मशीन द्वारे अत्यल्प किमतीमध्ये शासनातर्फे व महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 109 आरो मशीनचा जल शुद्धिकरण संयंत्र लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला. कार्यक्रमाला अमोल येलकी वार, सरपंच दहिवले मॅडम, विलास मडावी, पन्नालाल डोहणे, तानाजी गांग रेडीवार अनिल वासेकर, सुदर्शन अदेंकीवार व गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!