उर्जानगर येथे राष्ट्रसंत आॕगष्ट क्रांतीपर्व स्मृतीदिन संपन्न

उर्जानगर येथे राष्ट्रसंत आॕगष्ट  क्रांतीपर्व स्मृतीदिन संपन्न 



ऊर्जानगर  (प्रतिनिधी )  स्वातंत्र्याच्या पुर्वी सन १९४२ च्या क्रांतीलढ्यात राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी  भजन- भाषण, चातुर्मास, सामुदायिक प्रार्थना याद्वारे  विदर्भात  राष्ट्रचेतना जागृत केली. त्यांच्या  प्रेरणेने सामान्य जनतेनी स्वातंत्र्य लढ्यात उत्स्फूर्त सहभाग दर्शविला . अनेक  जण शहिद झाले. म्हणून या ऐतिहासिक अशा  चिमूर-आष्टी क्रांती लढ्याची माहिती जनमानसात पोहचायला हवी ,  असे प्रतिपादन अधिक्षक अभियंता डाँ. ए.एम.काथोये यांनी उर्जानगर येथे उदघाटन प्रसंगी केले.ते श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने आयोजीत " *राष्ट्रसंत आँगस्ट क्रांतीपर्व स्मृतीदिन* " कार्यक्रमात  बोलत होते  .
 
चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जानगरातील श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे  *राष्ट्रसंत आँगस्ट क्रांतीपर्व स्मृतीदिन* संपन्न झाला.यावेळी
मंडळाच्या पुरूष, महिला, बालगोपाल  उपस्थित  मान्यवरांनी  चिमूर आष्टी आँगस्ट क्रांतीलढ्यात शहिद झालेल्या हुतात्म्यांना मौन श्रद्धाजली वाहिली.या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक धमाणे  होते . चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राचे अधिक्षक अभियंता डाँ. ए. एम. काथोये यांच्या हस्ते उदघाटन झाले.  याप्रसंगी  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.स) अरविंद वानखेडे, सेवाधिकारी शंकर दरेकर ,  मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर गोहणे, प्रशांत दुर्गे ,  महिला अध्यक्षा सौ. सुषमा  उगे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन केल्यानंतर मंडळाचे सौ. सुषमा उगे, योगीता कोंडेकर,रूपाली चहानकर, जोत्सना लांडे यांनी *महाराष्ट्राची पविञ भूमी* *भारत भु चा प्राण*... हे स्फूर्तीगीत सामुदायिक रितीने  सादर केले. प्रास्तविक दिवाकर हेडाऊ यांनी केले.

चिमूर ऑगस्ट क्रांतीचे नायक राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांचे साहित्य परिवर्तनवादी असून  त्याचा प्रचार प्रसार व्हावा , असे मत अरविंद वानखेडे यांनी व्यक्त केले. मुर्लीधर गोहणे , प्रशांत दुर्गे  शंकर दरेकर आदिंनी  ह्या  दैदिप्यमान क्रांतीलढ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला .
मुख्य वक्ते ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनीही या क्रांतीकारी लढ्याचे अनेक संदर्भ उलगडून दाखविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक धमाणे यांनी आपल्या भाषणात आष्टीची समरगाता सांगीतली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव कोंडेकर यांनी केले तर आभार राजेंद्र लांडे यांनी मानले. 
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता सेवा मंडळाच्या महिला व पुरूषांनी परिश्रम घेतले. शेवटी राष्टवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!