पुणे जिल्हात विद्यार्थी संवाद यात्रेत राष्ट्रसंत साहित्यावर मार्गदर्शन

पुणे जिल्हात विद्यार्थी संवाद यात्रेत राष्ट्रसंत साहित्यावर मार्गदर्शन 

वैज्ञानिक दृष्टिकोनाने व्यक्तीला जाणिवांचे स्वातंत्र्य प्राप्त होते- बंडोपंत बोढेकर 


  (प्रतिनिधी )-  वैज्ञानिक दृष्टिकोन हा विचार आणि कृती करण्याचा महत्त्वपूर्ण  मार्ग आहे.सत्यशोधनाचा मार्ग आहे. मानवी जीवनाचे दिशादर्शन वैज्ञानिक दृष्टिकोनानेच प्राप्त होत  असून  त्यामुळे जाणिवांचे स्वातंत्र्य लक्षात येते. चारित्र्यवान समाज घडविणे ही प्रत्येकांची जबाबदारी आहे.विद्यार्थ्यांनी  थोरपुरूषांच्या चरित्रातून प्रेरणा घेत   स्वावलंबनासाठी लघु उद्योगाकडे , स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजेत , वेळेचे योग्य नियोजन करून आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजेत  ,असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी ओझर जि.पुणे येथे केले.  विघ्नहर विद्यालयात आयोजित विद्यार्थी संवाद " कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि नक्षत्राचं देणं काव्यमंच द्वारा संयुक्तपणे  आयोजित पुणे जिल्हा दौऱ्यात बंडोपंत बोढेकर यांनी   विविध शाळा महाविद्यालयास भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. प्रास्तविक वादळकार सुप्रसिद्ध कवी प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले .  बंडोपंत बोढेकर यांनी झाडीपट्टीतील बोली भाषेचे सौंदर्य , विदर्भातील लोक संस्कृती , राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांनी सांगीतलेले परिवर्तनाची सूत्रे ,  व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्व आणि उद्योगजकता या विषयांवर विद्यार्थ्यांसह  संवाद साधला. शिवनेरी परिसराला लागून असलेल्या जुन्नर या तालुका शहराच्या उपनगराध्यक्षा सौ. अलकाताई फुलपगार यांची जुन्नर येथे भेट घेऊन  राष्ट्रसंत साहित्य भेट दिले तसेच राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या साहित्य वाड्मयावर चर्चा केली.   नारायणगाव येथे वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या ज्ञानदिप सार्वजनिक वाचनालय ला भेट देऊन या वाचनालयाचे अध्यक्ष  संदीप बाबुजी नाईक यांना राष्ट्रसंत साहित्य भेट देण्यात आले.  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या   जयंती पर्व कार्यक्रमात विचार मांडण्यात आल्यानंतर  या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्रकुमार पाटोळे यांनी  आयोजन समितीच्या वतीने बोढेकर यांचा सत्कार केला. आला तसेच अष्टविनायक पैकी एक तीर्थ क्षेत्र मानल्या जाणाऱ्या  ओझर येथील विघ्नहर गणपती ट्रस्ट च्या वतीनेही ओझर येथील  मंदिरात राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज साहित्य सेवा कार्याबद्दल बोढेकर यांचा सत्कार करण्यात आला. धनगरवाडी येथील प्रगतीशील शेतकरी तथा मुंगफल्ली उत्पादक ज्ञानेश्वरदादा शेळके यांची भेट घेऊन या भागातील  शेतकऱ्यांची शेती, विविध पिकांची माहिती , येणाऱ्या अडचणी याबाबत संवाद साधला. या यात्रेचे नियोजन वादळकार प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी करून सेवा कार्यास सहकार्य केल्याबद्दल  राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!