जि.प.गट नेता डॉ.सतिश वारजूरकर यांच्या वतीने पळसगांव येथील महिलाना साडी वाटप

जि.प.गट नेता डॉ.सतिश वारजूरकर यांच्या वतीने पळसगांव येथील महिलाना साडी वाटप


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


चिमूर : - दि.०९/०९/१०१९ विधानसभा क्षेत्रात २० टक्के राजकारण तर ८० टक्के समाजकारण करण्याचे काम मागील काहि वर्षांपासून मा सतिश वारजूरकर करीत आहेत.चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील  पळसगाव येथील महिलांना  जि. प.गट नेता डॉ.सतीश वारजूरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पळसगांव येथील महिलांना साडी वाटप करण्याचा उपक्रम कांग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घरो घरी जाऊन साडी वाटप  करण्यात आले.चिमूर विधानसभा क्षेत्रा मधिल माझ्या महिला भगिनीवर दिन दुबळ्या गरीब कष्टकरी महिलांना प्रति आपुलकी, प्रेम, विश्वास असल्याने मी माझ्या स्व कमाईतून साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे, स्वतः  समाधानी आहे, प्रेम व विश्वास शेवटच्या श्वासा पर्यत टिकवून ठेवण्याचे काम कांग्रेस च्या कार्यकर्ते यांनी करायचे आहे, मातृशक्ती पितृ शक्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक कांग्रेस कार्यकर्ते यांनी परिश्रम करावे लागणार आहे . माता भगिनीना घरपोच  साडीभेट वस्तू पोहचवून देण्यासाठी कांग्रेस जेष्ठ कार्यकर्ता मा,मसूद शेख,सुभाष बनसोड, सदानंद बन्सोड, रोशन भोले, मंगलदास बन्सोड, तुळशीदास शेरकुरे,सुनील ठाकरे,सुनील कुंभरे,सारंग जमुंडे ,राजू सहारे ,जगदीश बन्सोड,राजू जुमडे, नवनाथ शेरकुरे,वसंताश्रीकांत भोले,रंजय मुंगमोडे,भास्कर बनसोड, मनोज चनफने सोनवाने,यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!