आलापल्ली लाडका राजा येथे मुस्लिमांच्या वतीने महाप्रसाद

अहेरी (सेवा पवार) 

यंदा आलापल्लीचा लाडका राजा येथे मुस्लिमांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
वर्षोनुवर्षे पासून चालत आलेल्या भारतीय संस्कृती नुसार भारतातील अनेक समाजातील नागरिक सोबत राहत आहेत.याचाच एक उदाहरण म्हणून यावर्षी आलापल्ली येथे मुस्लिमांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

आलापल्ली येथील लाडका राजा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गौरी पुत्र,बाप्पा विघ्नहर्ता गणपतीच्या मूर्तीचे घटस्थापना करण्यात येते आणि अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या मध्ये आरोग्य शिबीर,गरजूंना मदत,नेत्र तपासणी,चष्मे वाटप आणि दररोज अन्नदानाचे आणि महाप्रसादाचे आयोजन अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी या ठिकाणी करण्यात येत असते आणि आलापल्ली येथील नागरिक येथील कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि होणाऱ्या कार्यक्रमाचे आणि महाप्रसादाचे लाभ घेत असतात.

तर यावर्षी सामाजिक समतरतेचे संदेश देण्यासाठी मुस्लिमांच्या वतीने उद्या शनिवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच या दिवशी लाडका राजा गणेश मंडळ आलापल्लीच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन पण करण्यात आले आहे.

समस्त भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचे आणि महाप्रसादाचे लाभ घ्या असे आव्हान लाडका गणेश मंडळ आणि मुस्लिम युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 कार्यक्रमाला मुस्लिम युवक मंडळ आलापल्ली फिरोज शेख इरफान शेख इसरार शेख मुजाहिद शेख इम्रान पठाण फहिम शेख फैजल शेख रजत शेख वाजीद पठाण मोहसीन शेख सिद्दीक शेख वसीम पठाण शोएब सय्यद फराज शेख नदीम शेख हमीद शेख साहिल पठाण राहील शेख अमन खानवसीम खान अर्षद शेख दानिश हकीम असिफ शेखसोनू शेख शादाब शेखशाहरुख शेख व आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!