शेतातील विहिरीत आढळला शव

रविवारच्या रात्री पासून बेपत्ता असलेला जांभुळघाट येथील वसंता बारेकर यांचा शेतातील विहिरीत आढळला शव परिवारावर चिंतेचे व दुःखाचे कोसळले डोंगर
  

जांभूळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : - चिमूर तालुक्यतातील जांभुळघाट येथील गावा लगत पर्वताबाई तळेकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये वसंता बारेकर यांचा मृतदेह असल्याचे आज सकाळी उघडकीस आले असून, मृतक व्यक्ती हा जांभुळघाट येथील रहिवासी आहे.वसंता लक्ष्मण बारेकर वय ( ४६ ) वर्षे असे मृतक इसमाचे नाव असून मृतक काल रात्री  पासून बेपत्ता होता, व घरातील सर्व सदस्य त्याच्या शोधात होते. मृतक व्यक्तीचे शेत विहिरी लगत असल्याने मृतक शेतात गेला असावा व त्याला न कळताच पूर्ण भरून असलेल्या विहिरीत घसरून पडला असावा असा प्राथमिक निष्कर्ष नागरिक करीत असून, घटनेची माहिती भिसी पोलीस ठाण्यात कळवण्यात आली व पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मनोज गभने यांच्या सह पोलीस जमादार नवघरे तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!