खडसंगी येथे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ
खडसंगी येथे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ
मान्यता नसताना सर्रासपणे आलोपॅथिक औषधांचा वापर
आरोग्य विभाग अनभिज्ञ
जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभुळघाट : - चिमूर तालूक्यात मोठ्या प्रमाणात काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून रुग्णांवर मोठ्या प्रमाणात आरोग्यास हानिकारक असलेल्या स्टिरॉइड्सचा वापर परवानगी नसलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून केला जातो.या बाबिनी आरोग्य विभाग अनभिज्ञ असून या कडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
परिसरातील गावांचे केंद्रस्थान असल्याने खडसंगी परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी जिल्हापरिषदेच्या आरोग्यविभागाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे.या आरोग्य केंद्रात परिसरातील ३२ गावांचा समावेश आहे. औषधांचा तुटवडा व तोकड्या आरोग्यसेवे मुळे अनेक रुग्ण खासगी वैद्यकीय सेवेकळे वळतात.असाच खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची खडसंगी गावात मोठी संख्या आहे.
मोठी असणारी खासगी व्यावसायिकांची संख्येमुळे आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या औषधांचा वापर काही खासगी व्यावसायिक करीत आहेत. परिसरातील वयस्कर नागरिकांमध्ये स्नायूंच्या दुखण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
या दुखण्याला त्रासलेले रुग्ण उपचारासाठी विविध डक्टरांचा सल्ला घेतात.
खडसंगीत खासगी व्यावसायिकांची संख्या अधिक असल्याने डक्टरांत स्पर्धा ग्राहक टिकवून ठेवण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे.याच कारणाने काही डाँक्टर एलोपॅथिक औषधांच्या वापराची अधिस्वीकृती शैक्षणिक अहर्ता नसताना सरेरोस पणे रुग्णांच्या आरोग्यास हानीकारक ठरणाऱ्या स्टिरॉइड्स या औषधांचा सल्ला रुग्णांना देत आहेत.या औषधच्या नियमित सेवनाने रुगांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम घडत असून यामुळे त्वचा पातळ होणे, किडनी व लिव्हरचे विकार निर्माण होतात.या बाबीमुळे अनभिज्ञ असलेल्या आरोग्य विभागाने अशा प्रकारे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याची गरज आहे.
* औषध विक्रेत्यांची मिलिभिगत
एलोपॅथिक औषधांचा सल्ला देणाऱ्या संबंधित डाक्टरांची आवश्यक शैक्षणिक अहर्ता नसताना नियमाला डावलून रुग्णांना आलोपॅथिक औषध काही डाँक्टर लिहून देतात.डाक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाने खरेदी केलेल्या औषधांची पावती विक्रेत्यांनी देने बंधनकारक असते.मात्र संबधित विक्रेते व स्टिरॉइड्स व मान्यता नसताना एलोपॅथिक औषधांचा सल्ला देणारी डाक्टर यांची मिलीभगत असल्याने ते अश्या औषधांची पावती परिसरातील एलोपॅथिक औषधाच्या वापराची अधिस्वीकृती प्राप्त असलेल्या खासगी वैद्यकीय व्यावसायिक व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नावानी बनवीत असून रुग्णांना ती पावती रुग्णांना देत नाहीत. अश्या प्रकारे औषध विक्रेते सुद्धा या प्रक्रियेत सहभागी असून अन्न व औषध प्रशासन विभाग या बाबीने अनभिज्ञ आहे.
* आरोग्य विभागच उदासीन
जिल्हयातील बोगस डॉक्टरवर कारवाई करावी या साठी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता त्यावर वैद्यकीय शिक्षण मंडळाने जिल्हाधिकारी यांना या प्रकारवर आळा घळण्यासाठी कडक कारवाईच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान जिल्हाभरातील तालुकनिहाय समित्या बनवून बोगस डाक्टरांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.दरम्यान जिल्ह्यातील अनेक तालुक्यात या बाबत गुन्हे नोंदविण्यात आले पण चिमूर तालुक्यात अशी एकही कारवाई झाली नाही.
--------------------------------------
" मान्यता नसताना अलोपॅथीक औषधांचा सल्ला देणे बेकायदेशीर असून,या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला योग्य ती चौकशी करून कारवाई करून त्या बाबत चा अवहाल मागण्यात येणार.
- डाँ. गहलोत
जिल्हा आरोग्य अधिकारी,चंद्रपूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!