प्रयास संस्थेचा स्तुत्य उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षणाची नवी क्रांती

प्रयास संस्थेचा स्तुत्य उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षणाची नवी क्रांती


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - चंद्रपूर,जागृती सेवा संस्थान समिती नोएडा, नई दिल्ली अंतर्गत प्रयास उपक्रम महाराष्टातील संपूर्ण जिल्ह्यात 6 ते 7 महिन्यापासून प्रत्येक गावात जोमाने सुरू आहे. 
प्रयास प्रकल्पामुळे चिमुर तालुक्यातसुद्धा संपूर्ण गावात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे.प्रयास प्रकल्पामधून गावातील 4 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत अतिरिक्त शिक्षण मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ तथा त्यांची अभ्यास करण्याची इच्छा सुद्धा वाढलेली आहे   तसेच प्रत्येक गावामध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बेरोजगार  शिक्षित महिला तथा पुरुष शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबर बेरोजगारांना या प्रयास उपक्रमाअंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.त्याकरिता दि. 29/08/2019 रोजी चिमुर तालुक्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शिक्षक सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रयास उपक्रमाचे महाराष्ट्र क्षेत्रीय प्रभारी अधिकारी मा.महेंद्रजी सिडाम सर, जिवती चे बी.ओ. मा.कन्नाके सर, बल्लारशाह चे बी.ओ.मा. नामपल्ले सर, ब्रम्हपुरीचे बी.ओ. सय्यद सर, चिमुर तालुक्याचे पर्यवेक्षक मा. निकुरे सर, मा.पाटील सर, मा. मडावी सर, मा. झाडे सर, मा. गेडेकर मॅडम तथा चिमुर तालुक्यातील शेकडो शिक्षक सभेला उपस्थित होते.सभेला मा. सिडाम सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच चिमुर तालुक्यातील टेकेपार या गावातील प्रयास ची शिक्षिका कु. देवतळे मॅडम यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना संस्थेकडून मा. सिडाम सर यांचे हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वाना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!