अतिवृष्टीने घराची पडझड व शेतीची झालेली नुकसान भरपाई द्यावी - श्रमिक एल्गारची मागणी
अतिवृष्टीने घराची पडझड व शेतीची झालेली नुकसान भरपाई द्यावी - श्रमिक एल्गारची मागणी
मुल (पियुष रामटेके)
अतिवृष्टीमुळे घराची पडझड व शेतीची नुकसान झालेल्या लोकांना त्वरीत मदत देण्यात यावी यासाठी तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
मागील एक ते दिड महिण्यापासुन अतिवृष्टीने घरांची पडझड होत असुन अनेक जखमी होवुन जीव सुध्दा गमविले तसेच शेतकर्यांच्या शेतात असलेला रोवणा पाण्यामुळे वाहुन गेला व काही कुजून गेल्याने प्रचंड नुकसान झालेली आहे. श्रमिक एल्गार याची गंभिर दखल घेत श्रमिक एल्गारचे मुल तालुका अध्यक्ष रवी शेरकी यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने मुलचे तहसिलदार जाधव साहेब यांना निवेदन दिले.
यावेळी तहसिलदार जाधव यांचेकडे अतिवृष्टीने अनेकांचे घरे पडले त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देवुन घरकुल मंजुर करावे, तसेच शेतकर्यांच्या शेतातील वाहुन गेलेल्या रोवणीची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. नुकसान झालेल्या शेकडो व्यक्तीची यादी निवेदनासोबत देण्यात आली.
यावेळी तहसिलदार यांनी पंचनामे करुन मदत करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळ म्हणुन श्रमिक एल्गारचे मुल तालुका अध्यक्ष रवी शेरकी, अनिल शेंन्डे, अहमद दलाल, वामन नागापुरे, दिवाकर केळझरकर, चंद्रशेखर कडुकार, अहमद दलाल उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!