अतिवृष्टीने घराची पडझड व शेतीची झालेली नुकसान भरपाई द्यावी - श्रमिक एल्गारची मागणी
अतिवृष्टीने घराची पडझड व शेतीची झालेली नुकसान भरपाई द्यावी - श्रमिक एल्गारची मागणी
सावली (प्रतिनिधी):
येथील अतिवृष्टीमुळे घराची पडझड व शेतीची नुकसान झालेल्या लोकांना त्वरीत मदत देण्यात यावी यासाठी तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
मागील एक ते दिड महिण्यापासुन अतिवृष्टीने घरांची पडझड होत असुन अनेक जखमी होवुन जीव सुध्दा गमविले तसेच शेतक—यांच्या शेतात असलेला रोवणा पाण्यामुळे वाहुन गेला व काही पाण्याखाली कुजून गेल्याने प्रचंड नुकसान झालेली आहे. या बाबीची दखल घेत श्रमिक एल्गारने सावली तहसिल गाठले.
यावेळी तहसिलदार कुंभरे यांचेकडे अतिवृष्टीने अनेकांचे घरे पडले त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देवुन घरकुल मंजुर करावे, तसेच शेतकर्यांच्या शेतातील वाहुन गेलेल्या रोवणीची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. नुकसान झालेल्या शेकडो व्यक्तीची यादी निवेदनासोबत देण्यात आली.
यावेळी तहसिलदार यांनी पंचनामे करुन मदत करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळ म्हणून श्रमिक एल्गारचे सावली तालुका अध्यक्ष रामचंद्र हुलके, संघटनेचे कोषाध्यक्ष अनिलभाऊ मडावी, लेखराव उलके, लक्ष्मण उलके, शितल वाडगुरे, कुंदा गेडाम, ज्योती राऊत, रसिक राऊत, कविता शिंदे, मंगला मंडरे, देवकुबाई भंडारे, अमिता गड्डेकर उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!