आर्थिक साक्षरतेवर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

आर्थिक साक्षरतेवर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव


सावली (सुरेश कन्नमवार)

  बँक ऑफ इंडिया शाखा भं.तळोधीचे शाखाधिकारी मा. रमण डाफ यांच्या हस्ते बक्षीस वितरण प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या आर्थिक साक्षरतेवर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. बँक ऑफ इंडिया स्थापना दिनाच्या प्रित्यर्थ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भंगाराम तळोधी येथे स्पर्धा घेण्यात आली होती. सदर स्पर्धेत एकूण 97 विद्यार्थी सहभागी झाले होते.आर्थिक साक्षरता सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम आज दिनांक 11 सप्टेंबर 2019 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,भ.तळोधी येथे घेण्यात आला.त्यात शाळेतील उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ रेखा कारेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरक तथा बँक ऑफ इंडिया शाखा भंगाराम तळोधीचे शाखा व्यवस्थापन श्री रमण डाफ साहेब होते यासोबत प्रधानमंत्री जनधन योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना या विषयी माहिती देण्यासाठी विमा सल्लागार श्री बेले सर व विनायक यादनयूरवार हे देखीलउपस्थित होते.
 बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री राजेश्वर अम्मावार सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दुशांत निमकर सर यांनी केले आर्थिक साक्षरतेवर आधारित घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी अंकिता अशोक कोवे वर्ग सातवा,द्वितीय क्रमांक गायत्री संतोष ताजने वर्ग सातवा,तृतीय क्रमांक अनुष्का शंकर गुरनुले वर्ग सातवा, चतुर्थ क्रमांक सलोनी मोरेश्वर गुरनुले वर्ग सहावा, पाचवा क्रमांक आदर्श बाबूलाल मेश्राम वर्ग पाचवा सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे गुणगौरव करण्यात आला.
                सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मीना राजू मंच, शालेय मंत्रिमंडळ, उ श्रे मु अ सौ रेखा कारेकर,शाळेतील शिक्षक  श्री सुधाकर मडावी सर, सौ प्रणिता उईके मॅडम,श्री सुधीर सहारे,श्री दुशांत निमकर,श्री राजेश्वर अम्मावार,श्री अनिल चोखारे,श्री अरुण झगडकर,श्री आकाश झाडे,श्री विकास झाडे,श्री तानाजी अल्लीवार व  कु अर्चना थोरात मॅडम यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!